भारतीय क्रिकेटन नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला मंगळवारी (18 ऑक्टोबर) नवीन अध्यक्ष मिळाले. मागच्या काही दिवसांपासून रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष बनणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मंगळवारी अखेर त्यांची या पदासाठी नियुक्ती झाली. मुंबई स्थित बीसीसीआयच्या मुख्यालयात सर्वांच्या सहमतीने त्यांना अध्यक्षपदी नियुक्त केले गेले. तुम्हाला ऐकून अश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वात क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष एंग्लो इंडियन आहेत.
बिन्नी कुटुंबाला आहे क्रिकेटचे खूपच आवड –
रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचे संपूर्ण नाव रॉजर मायकल हम्फ्री बिन्नी (Roger Michael Humphrey Binny) असे आहे. ते भारतीय संघाचे पहिले एंग्लो क्रिकेटपटू होते. त्यांचे कुटुंब मुळचे स्कॉटलंडचे आहे, पण त्यांचा जन्म भारतात झाला आणि इथेच मोठे झाले. मुळचे स्कॉटलंडचे आसले, तर नंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. बिन्नी कुटुंबाला क्रिकेटची खूपच आवड आहे. वडिलांप्रमाणाचे मुलगा स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) देखील भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. स्टुअर्टने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर षटक टाकले.
रॉजर यांची सून मयंती लेंगर (Mayanti Langer) टिव्हीवरील सुप्रसिद्ध चेहरा आहे. क्रीडा समालोचनात तिचे मोठे नाव आहे. रॉजर बिन्नी यांनी त्यांचा जवळच्या बहिणीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या आधी त्यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केले आणि नंतर एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले. या दोघांना तीन आपत्य आहेत. लॉरा आणि लिसा ही त्यांच्या दोन मुलींची नावे, तर मुलाचे नाव स्टुअर्ट, जे सर्वाजण जाणतात.
भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघातही होता सहभाग –
रॉजर बिन्नी भारताला 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिले आहेत. त्यांनी या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघासाठी त्यांनी 1983 मध्ये 8 सामन्यांमध्ये 3.81 च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि 18 विकेट्स घेतल्या आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात त्यांनी 29 धावा देत चार विकेट्स घेण्याची कमाल करून दाखवली होती. त्यानतंर 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात बेन्सन ऍन्ड हेजेज वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील जिंकली होती. भारताने याठिकाणी पाकिस्तानला पराभूत करून अंतिम सामना नावावर केला होता. या स्पर्धेत बिन्नी दुसरे सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले. त्यांनी स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये 29.5 षटकांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. होत्या.
प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांची भूमिकाही पार पाडली –
बिन्नी भारतीय संघाचे माजी निवडकर्तेही राहिले आहेत. सप्टेंबर 2012 मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यापूर्वी त्यांनी भारताच्या 19 वर्षाखालील संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या मार्गदर्शनात या 19 वर्षाखालील संघाने 2000 साली विश्वचषक जिंकला होता. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये बिन्नींनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमधअये त्यांनी 47 विकेट्स आणि सोबतच 830 धावाही केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावापुढे 77 विकेट्स घेतल्या.
अशी आहे नवीन नवीन कार्यकारिणी –
दरम्यान, अध्यक्षपदासाबोतच मंगळवारी बीसीसीआयच्या इतर काही महत्वाच्या पदांवर देखील नवीन नावांची नियुक्ती केले गेली. जय शहा बीसीसीआय सचिव पदावर कायम आहेत. आशिष शेलार (कोषाध्यक्ष), राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजीत सैकिया (संयुक्त सचिव) यांचाही या यादीत समावेश आहे. बीसीसीआयेच मावळते कोषाध्यक्ष अरुण धुमल आता आय
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘जायंट किलर’ नामिबियाला पराभवाचा धक्का; शानदार विजयासह नेदरलँड्सचे मुख्य फेरीकडे पाऊल
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी






