शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12चा पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने आपलाच विक्रम मोडत इतिहास रचला. यावेळी न्यूझीलंड संघाच्या प्रत्येक फलंदाजाने आपले योगदान देत संघाला हा इतिहास रचण्यात मदत केली. चला तर न्यूझीलंडने काय विक्रम रचलाय, पाहूया…
न्यूझीलंड संघाने रचला इतिहास
सुपर 12 फेरीतील या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 200 धावा चोपल्या. हा धावांचा डोंगर उभा करताना न्यूझीलंडने आतापर्यंतचे आपले सर्व विक्रम मोडत इतिहास रचला. टी20 विश्वचषकात न्यूझीलंडने पहिल्यांदाच सर्वोच्च 200 धावांचा डोंगर उभा केला. यापूर्वी ते 200 धावांच्या खूप जवळ गेले होते, पण त्यांना असा पराक्रम गाजवता आला नव्हता.
A Jimmy Neesham SIX from the final ball of the innings pushes the total to 200 at the SCG. Conway 92*, @FinnAllen32 42 and @JimmyNeesh 26* leading the way with the bat. Follow play LIVE in NZ with @skysportnz & @SENZ_Radio. LIVE scoring | https://t.co/B2xf1USee1 #T20WorldCup pic.twitter.com/hCyWbLvauW
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2022
यापूर्वीच्या सर्वोच्च धावसंख्या
यापूर्वी न्यूझीलंडची सर्वोच्च धावसंख्या 198 इतकी राहिली होती. या धावा त्यांनी 2009मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळताना 5 विकेट्स गमावत चोपल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने 2012मध्ये बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना 3 विकेट्स गमावत 191 धावसंख्या उभारली होती. त्यापूर्वी 2007मध्ये सर्वप्रथम त्यांनी भारताविरुद्ध खेळताना सर्व विकेट्स गमावत 190 धावा चोपल्या होत्या.
टी20 विश्वचषकातील न्यूझीलंड संघाची सर्वोच्च धावसंख्या
200/3- विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (2022)
198/5- विरुद्ध- आयर्लंड (2009)
191/3- विरुद्ध- बांगलादेश (2012)
190- विरुद्ध- भारत (2007)
सामन्याचा आढावा
या सामन्यात 200 धावांचा डोंगर उभा करताना न्यूझीलंडून डेवॉन कॉनवे (Devon Conway) याने सर्वाधिक 92 धावा चोपल्या. त्याने या धावा करताना 2 षटकार आणि 7 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त फिन ऍलेन याने 42 धावा, जिमी निशम याने 26 धावा, कर्णधार केन विलियम्सन याने 23 धावा आणि ग्लेन फिलिप्स याने 12 धावांचे योगदान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऍडम झॅम्पा यानेही एक विकेट आपल्या नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!