टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले आहेत. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात असाच एक कारनामा पाहायला मिळाला, जो या विश्वचषकातील पहिला वहिला होता. शनिवारी (दि. 29 ऑक्टोबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात या विश्वचषकातील 27वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांच्या वरच्या फळीतील खेळाडूंनी केलेल्या फलंदाजीमुळे या विश्वचषकात पहिल्यांदाच विचित्र विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंड संघाचे पहिले तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्याच्या संघातील खेळाडूंनी सार्थ ठरवला. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 167 धावा केल्या. मात्र, यावेळी झाले असे की, संघाचे वरच्या फळीतील तीनही फलंदाज फिन ऍलेन (1 धाव), डेवॉन कॉनवे (1 धाव) आणि केन विलियम्सन (8 धावा) यांना फक्त एकेरी धावसंख्या करता आली.
New Zealand in trouble as they lose three big wickets in the Powerplay 👀#T20WorldCup | #NZvSL | 📝: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/jRhtECzjUf
— ICC (@ICC) October 29, 2022
श्रीलंका संघाचीही न्यूझीलंडसारखीच गत
दुसरीकडे, श्रीलंका संघाची गतही न्यूझीलंड संघासारखीच झाली. न्यूझीलंडने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाच्या वरच्या फळीतील तीनही फलंदाज पथुम निसांका (0 धाव), कुसल मेंडिस (4 धावा) आणि धनंजय डी सिल्वा यांना एकेरी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. यामुळे संघाची वरची फळी अक्षरश: ढासळली.
दोन्ही संघाच्या वरच्या फळीची लाजीरवाणी फलंदाजी
यामुळे झाले असे की, न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन्ही संघातील हा सामना टी20 विश्वचषकातील असा पहिलाच सामना ठरला, ज्यांचे पहिले तीनही फलंदाज फक्त एक आकडी धावसंख्या उभारू शकले.
टी20 विश्वचषकातील पहिलाच सामना, ज्यात दोन्ही संघांच्या अव्वल 3 फलंदाजांनी उभारली एकेरी धावसंख्या
न्यूझीलंड
1 धाव- फिन ऍलेन
1 धाव- डेवॉन कॉनवे
8 धावा- केन विलियम्सन
श्रीलंका
0 धावा- पथुम निसांका
4 धावा- कुसल मेंडिस
0 धावा- धनंजय डी सिल्वा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…
भुवनेश्वरच्या 42 मधील फक्त 12 चेंडूंवर फलंदाजाने काढल्या धावा, उर्वरित 30 बॉल डॉट टाकत रचला विक्रम