---Advertisement---

वेगाच्या तीन बादशाहांची दिमाखदार कामगिरी; आयपीएलमध्ये पहिल्यांदाच झाला ‘हा’ रेकॉर्ड

On: बुधवार, नोव्हेंबर 11, 2020 11:57 AM
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलची काल (१० नोव्हेंबर) सांगता झाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशा रंगलेल्या अंतिम सामन्यात, मुंबईने दिल्लीचा पराभव करत; पाचव्यांदा आयपीएलचा चषक उंचावला. अनेक मापदंडांवर उत्कृष्ट ठरलेल्या या आयपीएल हंगामात बरेचसे विक्रम तुटले आणि काही विक्रम नव्याने रचले गेले. त्याच यादीत कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांनी वेगवेगळ्या संघांकडून खेळतानाही एक अनोखा विक्रम नोंदवला.

हंगामात सर्वाधिक बळी मिळवून दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने ‘पर्पल कॅप’ आपल्या नावे केली. रबाडाने संपूर्ण हंगामात १७ सामने खेळताना ३० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मुंबई इंडियन्सचा ‘हुकमी एक्का’ असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत २७ बळींसह दुसऱ्या स्थानी राहिला. मुंबई इंडियन्सचाच दुसरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हादेखील २५ बळी मिळवण्यात यशस्वी ठरला.

याचबरोबर, आयपीएलमध्ये एकाच हंगामात तीन गोलंदाजांनी पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा जास्त बळी मिळवण्याची कामगिरी पहिल्यांदाच घडली. यापूर्वीच्या १२ हंगामात कोणीही अशी कामगिरी करू शकले नव्हते.

रबाडा, बुमराह आणि बोल्ट हे तिघेही अंतिम सामन्यात सहभागी होते. रबाडा व बुमराह या दोघांमध्ये संपूर्ण स्पर्धेत ‘पर्पल कॅप’ साठी चुरस रंगली. अंतिम सामन्यापूर्वी, रबाडा २९ बळींसह अव्वल स्थानी होता. तर, बुमराहने २७ बळी मिळवले होते. अंतिम सामन्यात रबाडाने एक बळी मिळविला. दुसरीकडे, बुमराहला एकही गडी बाद करता आला नाही. ट्रेंट बोल्टच्या खात्यात अंतिम सामन्यापूर्वी २२ बळी होते. मात्र, अंतिम सामन्यात भेदकक गोलंदाजी करत त्याने, आपल्या बळींची संख्या २५ पर्यंत नेली.

महत्त्वाच्या बातम्या –

शानदार ‘हिटमॅन’! दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत रोहितचे तडाखेबंद अर्धशतक; अनोख्या विक्रमाला गवसणी

संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!

हारले म्हणून काय झालं, दिल्लीचा आयपीएलमधील प्रवास मात्र राहिलाय रोमांचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---