---Advertisement---

जो विक्रम आतापर्यंत कधीही बनला नाही, तो अर्शदीप अन् सिराज जोडगोळीने रचला; एकदा वाचाच

Mohammed-Siraj-And-Arshdeep-Singh
---Advertisement---

मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मॅकलीन पार्क, नेपियर येथे झालेल्या तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध अविस्मरणीय गोलंदाजी केली. यामुळे न्यूझीलंडला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी यादरम्यान केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मोठा कारनामा रचला गेला.

दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंड संघाने तिसऱ्या सामन्यात आपला निर्णय बदलला. त्यांनी नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात सर्वबाद 160 धावा केल्या. तसेच, भारतापुढे 161 धावांचे आव्हान ठेवले.

भारताकडून कसलेली गोलंदाजी
न्यूझीलंडच्या डावात भारतीय गोलंदाजांकडून कसलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र, भारताच्या दोन गोलंदाज भलतेच चमकले. हे दोन गोलंदाज म्हणजेच अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) होय. या दोघांनीही न्यूझीलंडची फलंदाजी फळी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळण्यात सिंहाचा वाटा उचलला. अर्शदीपने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, सिराजने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या दोघांच्याही गोलंदाजीमुळे खास विक्रम नोंदवला गेला.

भारतीय संघाच्या दोन गोलंदाजांनी एका आंतरराष्ट्रीय टी20 डावात 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अर्शदीप आणि सिराजच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

भारताचा डाव
न्यूझीलंड संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर ईशान किशन (10) आणि रिषभ पंत (11) लवकर तंबूत परतले. त्यानंतर दुसऱ्या टी20त शतक साकारणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात 13 धावांवर बाद झाला. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने शून्य धावेवर गाशा गुंडाळला. कर्णधार हार्दिक पंड्या (30) आणि दीपक हुड्डा (9) सध्या खेळत आहेत. भारताने 9 षटकाअखेर 4 विकेट्स गमावत 75 धावा केल्या. पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. यावेळी भारतापुढे 66 चेंडूत 86 धावांचे आव्हान होते. (This is the first time two Indians took 4+ wicket haul in a T20I innings)

आंतरराष्ट्रीय टी20त पहिल्यांदाच भारतीय संघाच्या दोन गोलंदाजांनी 4 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या
मोहम्मद सिराज
षटके- 4, धावा- 17, विकेट्स- 4

अर्शदीप सिंग
षटके- 4, धावा- 37, विकेट्स, 4

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भले-भले आले, पण ‘ही’ कामगिरी फक्त भारतालाच जमली, अर्शदीप-सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे केलं साध्य
अर्शदीप अन् सिराजपुढे किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या, मालिका जिंकण्यासाठी भारतापुढे 161 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---