---Advertisement---

विश्वचषक इतिहासात असे पहिल्यांदाच घडले

On: मंगळवार, जुलै 2, 2019 1:46 PM
---Advertisement---

2019 विश्वचषकात सोमवारी(1 जूलै) वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात 39 वा सामना पार पडला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेकडून 21 वर्षीय अविष्का फर्नांन्डो आणि विंडीज कडून 23 वर्षीय निकोलस पुरन यांनी शतकी खेळी केल्या.

त्यामुळे विश्वचषकातील एकाच सामन्यात 25 पेक्षा कमी वय असणाऱ्या दोन खेळाडूंनी शतके करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यात फर्नांन्डोने 103 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. यावेळी त्याचे वय 21 वर्षे 87 दिवस एवढे होते. त्याच्या या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 338 धावा केल्या आणि 339 धावांचे आव्हान विंडीज समोर ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पुरनने 103 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 118 धावा करत चांगली झुंज दिली. पण त्याला अँजेलो मॅथ्यूजने बाद केले आणि श्रीलंकेच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पुरनने हे शतक केले तेव्हा त्याचे वय 23 वर्षे 272 दिवस एवढे होते.

या सामन्यात अखेर श्रीलंकेने विंडीजला 50 षटकात 9 बाद 215 धावांवर रोखण्यात यश मिळवत सामनाही जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विजय शंकरच्या जागी निवड झालेल्या मयंक अगरवालची अशी आहे कामगिरी

पाकिस्तानच्या या खेळाडूने काढली भारताची खोड!

धोनीने इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये रचला इतिहास, युवराज सिंगलाही टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment