इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. परंतु, भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंड संघाला या सामन्यात १५७ धावांनी पराभूत केले. यासह कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान मोठ्या विक्रमाला ही गवसणी घातली आहे.
या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली फटकेबाजी करत ४६६ धावांचा डोंगर उभारला होता. यासह इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात, इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली होती. परंतु, इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २१० धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने हा सामना १५७ धावांनी आपल्या नावावर केला.
या मालिकेतील भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने दुसऱ्यांदा असा कारनामा केला आहे. इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंड संघाला पराभूत करणे हे प्रत्येक कर्णधाराचे स्वप्नं असते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे. लॉर्ड्स आणि ओव्हलच्या मैदानावर विजय मिळवत भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ची आघाडी घेतली आहे. यासह भारतीय संघाने ३५ वर्षांपूर्वी केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत दुसऱ्यांदा दोन कसोटी सामन्यात विजय मिळवले आहे. यापूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने असा कारनामा केला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८६ मध्ये दोन कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. (This is the second time that India won more than a one time in England)
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित सुपरहिट! सामनावीराचा पुरस्कार मिळवत ‘या’ यादीत युवराजला टाकले मागे
आशियाचा किंग! ओव्हल कसोटीतील विजयासह विराट ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार
‘लॉर्ड शार्दुल’ इन ॲक्शन! जो रुटला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला दिला जोरदार दणका, पाहा व्हिडिओ