---Advertisement---

भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?

On: रविवार, ऑक्टोबर 10, 2021 7:24 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्री नंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार याबाबत चर्चा होत आहेत. अशातच आता सनरायझर्स हैदराबाद संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांचे नाव आता या शर्यतीत सामील झाले आहे. दरम्यान, असेही समोर आले आहे की, डेविड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधार पदावरून हटवण्याची योजना टॉम मूडी यांचीच होती.

वॉर्नरला कर्णधारपदावरून काढल्यानंतर त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हन मधूनही बाहेर केले गेले. विशेष म्हणजे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स स्पोर्ट्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, मूडीने वॉर्नरला हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा निर्णय भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी घेतला.

सनरायझर्स हैदराबाद संघांच्या मालकाचे बीसीसीआयमध्ये चांगले वजन असल्याचे सांगितले जाते. वृत्तात असेही सांगितले गेले आहे की, हैदराबाद फ्रेंचायझी मालकांचा बीसीसीआयमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये व्यवस्थापनाने वॉर्नरला बाहेर ठेऊन युवा खेळाडूंना संघात का स्थान दिले, याबाबत अंदाज येतो. वॉर्नरला हैदराबादने दिलेल्या वागणुकीमुळे इतर फ्रेंचायझी हैराण आहेत आणि त्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधत असल्याचेही या वृत्तात सांगितले गेले आहे.

असे असले तरी, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात वॉर्नरला काही सामन्यात खेळवले गेले. पण तो या सामन्यात काही कमाल करू शकला नाही. तो दोन सामन्यात ० आणि २ धावा करून बाद झाला. यानंतर वॉर्नरला एकही सामन्यात संधी दिली गेली नाही आणि नंतर त्याला १८ सदस्यांच्या संघातूनही बाहेर करण्यात आले. यावर संघाचे मुख्य प्रशिक्षक बेलिसने सांगितले की, संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला म्हणून हा निर्णय घेतला गेला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

दिल्ली वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

आयपीएल २०२२मध्ये वॉर्नर हैदराबाद सोडून खेळणार दुसऱ्या संघांकडून? अन्य फ्रँचायझीनी संपर्क साधल्याची चर्चा

टी२० विश्वचषकातील सर्व १६ संघ होणार मालामाल! आयसीसीकडून बक्षीस रकमेची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---