भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले तर,दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले आहे. जेम्स अँडरसनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर तो गोल्डन डकवर माघारी परतला. यानंतर माजी पाकिस्तानी खेळाडूने त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तान संघाचे माजी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “महान खेळाडू (विराट कोहली) देखील आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी आपल्यापेक्षा युवा खेळाडूकडून शिकू शकतात. जेव्हा केएल राहुल फलंदाजी करत होता, तेव्हा सर्व व्यवस्थित दिसून येत होतं. तो चेंडूच्या अगदी जवळ जाऊन खेळत होता. त्याला माहित होते की, त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत अशीच फलंदाजी केली जाते.”(Pakistani cricketer gave advice to Virat Kohli learn how to bat from kl rahul)
विराटला राहुलकडून शिकण्याची गरज
तसेच रमिज राजा यांनी पुढे म्हटले की,”केएल राहुल ज्याप्रकारे हलक्या हाताने फलंदाजी करत होता, त्यातून विराट खूप काही शिकू शकतो. येणाऱ्या सामन्यांमध्ये विराटने देखील हलक्या हाताने खेळायला हवं. तसेच त्याने स्वतःला सेट होण्यासाठी वेळ द्यायला हवा.”
तसेच विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद करणाऱ्या जेम्स अँडरसनने म्हटले की,”मला तर विश्वास बसत नव्हता, विराट कोहली इतक्या लवकर बाद होईल. ही आमच्या संघासाठी सकारात्मक बाब होती.”
या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या १८३ धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. केएल राहुलने या डावात अर्धशतक झळकावले. तसेच दुसऱ्या दिवसाचा खेळ हा पावसाममुळे थांबवण्यात आला होता. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाच्या एकूण धावा ४ बाद १२५ होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात मैदान गाजवणारा ‘हिटमॅन’ परदेशात मात्र फ्लॉप; पाहाच ‘ही’ आकडेवारी
ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने ‘या’ खेळाडूच्या कुटुंबावर जातीवाचक टीका
टी२० विश्वचषकासाठी माजी निवडकर्त्याने निवडला भारताचा संभाव्य संघ, पाहा कोण इन कोण आऊट





