यंदाचा आयपीएलचा १५वा हंगाम आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत ५६ सामने खेळून झाले आहेत. मात्र, अजूनही या हंगामातील कोणत्याही संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. असे असले, तरीही मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलचे १४ हंगाम पार पडले आहेत आणि १५वा हंगाम यावर्षी महाराष्ट्रात खेळला जात आहे. मात्र, आयपीएलच्या पहिल्या हंगामात काही पाकिस्तानी खेळाडूंनीही भाग घेतला होता. आपण या लेखातून अशा १२ पाकिस्तानी खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला होता. (Pakistani Players Who Played In IPL 2008)
१. शोएब अख्तर
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत सर्वात वेगवान चेंडू फेकणारा आणि ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा या यादीत समावेश आहे. तो २००८ साली कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघाकडून खेळला होता. त्याने कोलकाताकडून ३ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने एकूण ५ विकेट्स आपल्या नावावर केले होते. पाकिस्तानचा शोएब अख्तर आणि हरभजन सिंग यांच्यातील भांडण सर्वांनाच माहितीये आहे. आशिया कप २०१२च्या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही क्रिकेटपटूंमध्ये जोरदार वाद झाला होता.
२. सोहेल तन्वीर
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर सन २००८मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. या आयपीएल हंगामात त्याने शानदार गोलंदाज करत सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या खास कामगिरीमुळे तन्वीर आयपीएल २००८ साली पर्पल कॅपसाठी (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाणारी टोपी) मिळणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
३. शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा अष्टपैलू फलंदाज आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सन २००८च्या आयपीएल हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. मात्र, त्याला या हंगामात खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने १० सामन्यात फक्त ८१ धावा केल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना फक्त ९ विकेट्स घेतल्या होत्या.
४. शोएब मलिक
सन २००८मध्ये शोएब मलिकने आयपीएल संघ दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. त्यावेळी दिल्लीच्या ताफ्यात एबी डिविलियर्स, तिलकरत्ने दिलशान, डॅनियल विट्टोरी आणि ग्लेन मॅकग्रा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळे मलिकला जास्त संधी मिळाली नाही. मलिकने आयपीएल २००८मध्ये ७ सामने खेळत ५२ धावांचे योगदान दिले होते.
५. मोहम्मद हाफिज
आयपीएल खेळणारा पाचवा पाकिस्तानी फलंदाज म्हणजे मोहम्मद हाफिज होय. त्याने २००८मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो या हंगामात अष्टपैलू खेळाडू म्हणून अपयशी ठरला होता. हाफिजने कोलकातासाठी ८ सामने खेळताना फक्त ६४ धावा केल्या होत्या.
६. मोहम्मद आसिफ
आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाने मोहम्मद आसिफला आपल्या ताफ्यात सामील केले होते. यावेळी त्याने दिल्लीकडून एकूण ८ सामने खेळले होते.
७. सलमान बट्ट
पाकिस्तान संघाचा डावखुरा फलंदाज सलमान बट्ट २००८ आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. त्याने आयपीएल २००८मध्ये ७ सामने खेळताना १९३ धावा चोपल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने ५४ चेंडूत ७३ धावांची विस्फोटक खेळी केली होती.
८. कामरान अकमल
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता. अकमलने राजस्थानकडून एकूण ६ सामने खेळले होते.
९. उमर गुल
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज उमर गुलदेखील जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी२० लीग असलेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळला होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
१०. मिस्बाह-उल-हक
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता असलेला मिस्बाह-उल-हक याने आयपीएल २००८मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००७ विश्वचषकात मिस्बाहने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल २००८मध्ये बेंगलोरने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, या हंगामात मिस्बाहला ८ सामन्यात फक्त ११७ धावाच करता आल्या होत्या.
११. युनूस खान
पाकिस्तान संघाचा खेळाडू युनूस खानही आयपीएल २००८मध्ये खेळला होता. मात्र, त्याला या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून फक्त १ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
१२. अब्दुल रज्जाक
आयपीएल २००८मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकला आपल्या ताफ्यात सामील केले होते. रज्जाकने फक्त १ सामना खेळला होता. यावेळी त्याला २ चेंडू खेळताना एकही धाव करता आली नव्हती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पोराची बातच न्यारी! थेट चालू सामन्यातच स्कूटर घेऊन घुसला मैदानात, पाहायला मिळाला विचित्र नजारा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराटचा पत्ता होणार कट? निवडकर्ते करणार कोहलीशी चर्चा
क्रिकेटर नसता, तर ‘हे’ काम करून देशाची सेवा केली असती; दिल्लीच्या ‘दबंग’ खेळाडूचा मोठा खुलासा