भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून कसोटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराबद्दल एक भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघ निर्भीडपणे करेल दौरा
सन 2018-2019 साली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली होती. यंदा होणाऱ्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला की, “नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय संघ निर्भीडपणे ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.”
पुजाराला करावे लागेल कष्ट
“ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील मालिकेत पुजाराने चांगली कामगिरी केली होती, मात्र या मालिकेत ती मानसिकता पुजाराकडे नाही. त्याने बराच काळ मधल्या फळीत फलंदाजी केली नाही. कारण तो मैदानापासून दूर होता. मागील काही महिन्यांपासून त्याने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट न खेळल्यामुळे कदाचित त्याला मागील मालिकेपेक्षा या मालिकेसाठी अधिक कष्ट करावे लागेल,” असे पुजाराबद्दल बोलताना मॅकग्रा म्हणाला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आक्रमक
सन 1990 आणि 2000 मध्ये भारतीय संघ तितका मजबूत नव्हता. मात्र, 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने 1-1 ने मालिका बरोबरीत केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आक्रमक आहे. दोन वर्षांपूर्वी या संघाने 2-1 ने कसोटी मालिका जिंकली होती. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.
विराट कोहली खेळेल फक्त एक कसोटी सामना
यावेळी परिस्थिती वेगळी आहे. फेब्रुवारी 2020 नंतर ही भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल आणि कोहली 17 डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरु होणारा पहिलाच कसोटी सामना खेळेल. पालकत्व रजा घेतल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे.
वॉर्नर-स्मिथ सज्ज
विराटच्या गैरहजेरीत भारताचा सामना डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांशी होईल. चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी घातल्यामुळे ते 2018-19 च्या कसोटी मालिकेत खेळले नव्हते. त्यामुळे यंदाच्या कसोटी मालिकेत हे दिग्गज फलंदाज चमक दाखवण्यासाठी सज्ज आहे. मार्नस लॅब्यूशानेसारखा उत्कृष्ट फलंदाज भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान असेल.
…ऑस्ट्रेलियाकडे जिंकण्याची संधी
“विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाकडे मालिका जिंकण्याची संधी असेल. त्याच्या अनुपस्थितीमुळे मालिकेवर प्रभाव पडेल. त्याचासारखा दर्जेदार आणि उत्तम कौशल्य असलेला खेळाडू मालिकेच्या काही सामन्यांना मुकणार हा एक मोठा धक्का आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना ही जबाबदारी पार पाडावी लागेल. पहिल्या बाळाच्या जन्मासाठी परत जाण्याची त्याची इच्छा आहे हे मी पूर्णपणे समजू शकतो,” असेही पुढे बोलताना मॅकग्रा म्हणाला.
विराट आधुनिक युगातला अद्वितीय फलंदाज
विराट कोहलीची प्रशंसा करताना मॅकग्रा म्हणाला की, “मागील मालिकेत विराटने चांगली कामगिरी केली होती. त्याने मधल्या फळीत फलंदाजी करत बराच वेळ खेळपट्टीवर घालवला होता. धावा करत नसला तरीही तो स्वतःवर दबाव येऊ देत नाही. तो आधुनिक युगातला अद्वितीय फलंदाज आहे. आधुनिक काळातील काही फलंदाज निर्धाव षटकानंतर धावा काढण्याचा प्रयत्न करतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्मिथ, वॉर्नरच्या येण्याने ऑस्ट्रेलिया मजबूत तर भारतीय गोलंदाजी त्याहून भक्कम’
इरफान पठाणच्या आयपीएल २०२० संघातून विराट- रोहितला डच्चू, ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंची अनोखी युक्ती, करतायेत टेनिस बॉलने सराव, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…