भारताता कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. तर हजारो लोक कोरोनामुळे आपले प्राण गमावत आहेत. याचा फटका इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामालाही बसला आहे. आयपीएल २०२१ मध्ये सहभागी क्रिकेटपटू आणि इतर सदस्यांना कोरोना लागणीचे प्रमाण वाढत असल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
तरीही खेळाडूंचे कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण अद्याप थांबलेले नाही. नुकताच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा कोरोनाच्या विळख्यात सापडला असल्याचे वृत्त पुढे येत आहे. वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, टिम सिफर्ड यांच्यानंतर कोरोनाची लागण होणारा तो कोलकाता संघाचा चौथा खेळाडू आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि भारताचा इंग्लंड दौरा यासाठी निवडलेल्या भारतीय कसोटी संघात प्रसिद्धला स्थान देण्यात आले आहे. त्याला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
KKR and India pacer Prasidh Krishna tests COVID-19 positive
Read @ANI Story | https://t.co/14JVdbRRSM pic.twitter.com/AtvTHVKOjd
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2021
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता संघातील अधिकाऱ्याने प्रसिद्धचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. “प्रसिद्ध कृष्णाची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्याच्या चाचणीचा अहवाल पुढे आला असून तो पॉझिटिव्ह आढळला आहे,” असे कोलकाता संघाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रसिद्धला भारतीय कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत ३ सामने खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या ५४ धावांवर ४ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. याबरोबरच त्याला देशांतर्गत स्तरावर थोडाफार कसोटी स्वरुपातील सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९ सामने खेळताना ३४ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिला डोस; शिखर धवनपाठोपाठ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने घेतली कोरोना लस
धोनी तो धोनीचं, ‘ते’ कौतुकास्पद कार्य एकटा ‘कॅप्टनकूल’च करु शकतो; माजी क्रिकेटरने केली स्तुती
“खूप दु:ख होतं, जेव्हा आयपीएलमध्ये ७ वर्षे कोणीही खरेदीदार मिळत नाही,” पुजाराने व्यक्त केल्या भावना