सर्वांनाच माहिती आहे की, भारतीय संघ जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. याच बद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी स्मिथ म्हणाला की, ऑस्ट्रेलिया संघाला जगातील अव्वल क्रमांकाचा संघ असलेल्या भारतीय संघाच्या मायदेशात कसोटी मालिका जिंकायला आवडेल.
आयपीएल फ्रंचायझी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघामार्फत आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू गोलंदाज ईश सोधीशी (Ish Sodhi) बोलताना स्मिथने (Steve Smith) सांगितले की, “नक्कीच, आम्हाला भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकायला आवडेल. एक ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून आम्ही ऍशेस मालिका, विश्वचषकाबद्दल चर्चा करतो. सहसा जे मोठ-मोठे सामने आहेत. परंतु मला असे वाटते की, भारताविरुद्ध त्यांच्याच घरात मालिका खेळणे कठीण आहे. त्यामुळे मला भारतात कसोटी मालिका जिंकायची आहे.”
ऑस्ट्रेलियाने २००४पासून भारतात एकही सामना जिंकलेला नाही. यावेळी बोलताना स्मिथ म्हणाला की, भारताला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करण्याशिवाय त्याचे इतर कोणतेही मोठे उद्देश्य नाही. परंतु सुधारणा करण्यासाठी अनेक मालिका आणि दिवस लागतात.
खरं तर ऑस्ट्रेलियाला मायदेशात कसोटी सामन्यात पहिल्यांदाच भारताविरुद्ध १-२च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ फलंदाज स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्याशिवाय खेळला होता. स्मिथ आणि वॉर्नरवर चेंडू छेडछाडप्रकरणी एक वर्षांची बंदी घातली होती.
भारतात १ जानेवारी २०११पासून केवळ इंग्लंड संघ २ तर ऑस्ट्रेलिया संघ १ कसोटी सामना जिंकला आहे. याच काळात ४३ कसोटी सामन्यात भारताने ३३ विजय, ३ पराभव व ७ सामने अनिर्णित राखले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा






