क्रिकेट जगातला महान स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यास सगळेच आतूर आहेत. त्याने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण पुढील तीन वर्षे तो रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून (आरसीबी) खेळला. मात्र आयपीएल २०२२ आधी डिविलियर्सने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पण आता डिविलियर्स इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) २०२३च्या हंगामात आरसीबीमध्ये परतण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी तो संघामध्ये कोणती भुमिका साधणार हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
२०११ पासून आरसीबीकडून खेळणाऱ्या डिविलियर्सने २०२१ला शेवटचा हंगाम खेळला होता. यानंतर त्याने क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. तर नुकत्याच झालेल्या दानिश सैतच्या आरसीबी इनसायडर या कार्यक्रमात विराट कोहलीने डिविलियर्स संघात पुनरागमन करणार असा इशारा दिला आहे. यावेळी तो खेळाडू की संघमार्गदर्शक म्हणून संघात परतणार हे कोहलीने स्पष्ट केले नाही.
“डिविलियर्सशी मी अजूनही संपर्कात आहे. त्याने संघात पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे”, असेही कोहलीने या कार्यक्रमात पुढे म्हटले आहे. कोहली आयपीएल२०२२च्या हंगामात कर्णधाराच्या पदावरून पायउतार झाला.
डिविलियर्सनेही संघात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्हीयूस्पोर्ट्स बरोबर बोलताना तो म्हणाला, “मी पुढच्या आयपीएल हंगामात आरसीबीत असणार आहोत. संघाकडून खेळणार की नाही हे मात्र असून निश्चित नाही. पण आपण २०२३च्या हंगामासाठी नक्कीच संघाच्या संपर्कात असणार आहे.”
डिविलियर्सने आयपीएलची सुरूवात दिल्ली डेयरडेविल्सकडून केली होती. २०११मध्ये त्याने आरसीबीमध्ये प्रवेश करत पुढील ११ वर्षे तो या फ्रॅंचायजीकडून खेळला. या दरम्यान त्याने १५७ सामन्यात ४५२२ धावा केला. तसेच तो आरसीबीचा सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाजी ठरला आहे. त्याने अनेक सामन्यात आरसीबीला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.
आरसीबीसाठी डिविलियर्स-कोहली या जोडीने पाच वेळा शतकीय आणि दोन वेळा व्दिशतकीय भागीदाऱ्या केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ही क्रिकेट जगातील एकमेव जोडी आहे. तसेच तो २०१६च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने १६ सामन्यात ५२.८४च्या सरासरीने ६८७ धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅच सुरू असतानाच मेंडिसच्या छातीत असह्य वेदना, दाखल करावं लागलं थेट हॉस्पिटलमध्ये
‘…तर मी पुढच्या वर्षी चेन्नईसाठी खेळू शकतो’, वाचा असं का म्हणाला अमीर खान
Video: यॉर्करवर उत्तर शोधण्यासाठी परागने घेतली थेट मलिंगाचीच मदत, पाहा रियानचा खास ‘रियाज’