चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सोमवारी(१९ ऑक्टोबर) म्हटले आहे की वरिष्ठ खेळाडूंसह सलग तिसर्या आयपीएल हंगामात खेळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेन्नई संघ आयपीएल २०२० मध्ये आत्तापर्यंत १० सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे.
चेन्नईला सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर बोलताना फ्लेमिंग म्हणाले, ‘संघाची उमेद आता कदाचीत संपली आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. तूम्ही जर मागील ३ वर्षांकडे पाहिले तर आम्ही पहिल्या वर्षी(२०१८) आयपीएल जिंकलो. नंतर आम्ही (२०१९च्या हंगामात) शेवच्या चेंडूवर अंतिम सामन्यात पराभूत झालो आणि आम्हाला वाटले होते की तिसऱ्या वर्षी(२०२०) वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण असेल. त्यात युएईतील परिस्थिती नवीन गरजांनुसार आमच्यासाठी आव्हानात्मक होती.’
चेन्नई संघातील बहुतेक खेळाडूंनी वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहे. यात एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर अशा खेळाडूंचा समावेश आहे.
संघाचे मनोबल खालावले
ते पुढे म्हणाले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर संघाचे मनोबल खालावले आहे. आम्ही काही सामन्यात विजयाच्या खूप जवळ होतो पण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आम्ही कमी पडलो. आम्हाला माहित होते की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा आमच्यासाठी महत्त्वाचा सामना होता.’
प्लेऑफची संधी कमी
‘मला वाटते की आता प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आमच्याकडे खूप कमी संधी आहे. पण जेव्हा तूम्ही दुसऱ्यांच्या निकालावर अवंलबून असता तेव्हा उत्साह राखणे आणि सकारात्मक राहाणे कठीण असते,’ असेही फ्लेमिंग यांनी म्हटले आहे.
विशेष गोष्ट अशी की चेन्नईने याआधी खेळलेल्या प्रत्येक आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जर यंदा जर त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आले तर ही त्यांची प्लेऑफ न खेळण्याची पहिली वेळ असेल.
चेन्नईचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) शारजाह येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020 : आज बेंगलोर-कोलकाता येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
ठरलं ! भारताचा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना होणार ‘या’ शहरात
बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…