भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला आहे. 27 नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी सरावाला कसून सुरुवात केली आहे. दोन्ही संघांचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहे. मागील हंगामातील संघाच्या तुलनेत हा ऑस्ट्रेलिया संघ अधिक मजबूत आहे, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना आहे. द एज या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लेंगर बोलत होते.
ऑस्ट्रेलियाच्या मागील दौर्यावर (2018-2019) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत 2-1 ने पराभव केला होता. प्रथमच आशियाई संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. त्या दौऱ्यावर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर अनुपस्थित होते. त्यांना बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे 1 वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलताना लँगर म्हणाले की, ‘2 वर्षानंतर यंदा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजी विभाग अधिक हुशार झाला आहे. यावेळी आमचा संघ भारतीय खेळाडूंसमोर एक चांगले आव्हान सादर करेल.
“मला तो काळ (2018-19) आठवला ज्यावेळी आम्ही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) नाणेफेक गमावला होता. पर्थ कसोटी सामना जिंकल्यानंतर आम्ही सपाट खेळपट्टीवरील सामन्यात नाणेफेक गमावला. त्या सामन्यात भारताने सुमारे दोन दिवस गोलंदाजी केली होती. त्यानंतर आम्हाला सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळायचे होते आणि तेथील खेळपट्टीही सपाट होती.” असेही पुढे बोलताना लँगर म्हणाले
तसेच लँगर म्हणाले, ‘कोणतेही निमित्त पुढे करणार नाही, पण खरंच भूतकाळाची आठवण चांगली नाही. भारतीय संघ त्यावेळी (2018-19) अव्वल दर्जाचा खेळ करत होता. ते आम्हाला पहिल्यांदाच इथे पराभूत करण्यासाठी पात्र होते. पण आता २ वर्षांनी आमचे खेळाडू आणखी चांगले झाले आहेत आणि भारतीय खेळाडूही दोन्ही संघ अनुभवी आहे. आता दोन्ही संघांच्या सामन्यांची आतुरता आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती
भारतीय गोलंदाजांना स्टिव्ह स्मिथचं चॅलेंज, “जर मला शॉर्ट चेंडू टाकण्याचा विचार करत असाल तर…”
“स्ट्रायकर होण्यासाठी शारीरिक शक्ती महत्वाची”, २१ वर्षीय प्रतिभावान हॉकीपटूची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर