यंदाच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाला यावेळी ऍशेस मालिका आयोजित करायची असून बोर्डाने या मालिकेचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर केले आहे. 2025-26 च्या ऍशेस मालिकेला पर्थ येथून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. जे की 43 वर्षांनंतर या ठिकाणी प्रथमच ऍशेस मालिकेतील पहिला सामना आयोजित होईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सरकारच्या सहकार्याने ऍशेस मालिकेच्या तारखांची घोषणा आज (बुधवारी 16 ऑक्टोबर) रोजी पर्थमधील स्कारबोरो बीच येथे एका कार्यक्रमात केली.
21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पर्थ कसोटीने पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेची सुरुवात होणार आहे. यानंतर, दुसरा कसोटी सामना गाबामध्ये खेळवला जाईल. जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून हा सामना 8 डिसेंबरपर्यंत खेळवला जाणार आहे. यानंतर ख्रिसमस कसोटी सामना होणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांना सुमारे एक आठवड्याचा ब्रेक मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्येही ब्रेक आहे.
तिसरा कसोटी सामना 17 ते 21 डिसेंबर दरम्यान ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरू होईल. जो 30 डिसेंबरपर्यंत खेळला जाईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना हा नवीन वर्षाचा कसोटी सामना असेल. जो 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 पर्यंत सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर होईल.
ऍशेस मालिका 2025-26 वेळापत्रक
पहिली कसोटी – 21 ते 25 नोव्हेंबर- पर्थ
दुसरी कसोटी – 4 ते 8 डिसेंबर – ब्रिस्बेन (दिवस/रात्र कसोटी)
तिसरी कसोटी – 17 ते 21 डिसेंबर – ॲडलेड
चौथी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर – मेलबर्न
पाचवी कसोटी – 4 ते 8 जानेवारी – सिडनी
हेही वाचा-
SL vs WI: श्रीलंकेचा पलटवार, वेस्ट इंडिजचा दारुण पराभव, मालिकेत बरोबरी
भारत-न्यूझीलंड कसोटीपूर्वी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस, टाॅसला उशीर, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
बीसीसीआय कर्णधाराला हटवण्याच्या तयारीत! भारताच्या खराब कामगिरीमुळे निर्णय?






