---Advertisement---

आधी केली क्रिकेटची सेवा, आता थेट सैनिक होऊन करणार देशाची सेवा

On: गुरूवार, जानेवारी 2, 2020 8:01 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वात अनेक खेळाडूंनी क्रिकेटशिवाय इतर क्षेत्रातही काम करताना पाहायला मिळतात. अशाच प्रकारे आता श्रीलंकेचा 30 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने (Thisara Perera) श्रीलंकेच्या सैन्यात गाजाबा रेजिमेंटमध्ये ‘मेजर’ हे पद स्विकारले आहे.

याची माहिती परेराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

तो म्हणाला की, लष्कराचे लेफ्टनंट जनरल शवेंद्र सिल्वा (Lieutenant General Shavendra Silva) यांच्या आमंत्रणावर तो सैन्यात सामील झाला आहे.

परेराला गाजाबा रेजिमेंटमध्ये मेजर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्याचे हे पद मानद प्रकारातील आहे.

यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंदीमलदेखील (Dinesh Chandimal) श्रीलंकेच्या सैन्यात सामील झाला होता. त्याने लष्कर क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी हा प्रस्ताव स्विकारला होता.

परेराने श्रीलंकेकडून आतापर्यंत 6 कसोटी सामने,  161 वनडे आणि 79 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 203, 2210 आणि 1169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने या तिन्ही क्रिकेट प्रकारात अनुक्रमे 11, 171 आणि 51 विकेट्स घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---