बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 110 धावा केल्या आहेत.
भारताच्या या डावात शिखर धवन, केएल राहुल आणि आर अश्विन हे तीन खेळाडू प्रत्येकी 13 धावांवर बाद झाले. त्यामुळे सर्वांनाच अनलकी 13 ची आठवण झाली आहे.
एका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद होण्याची ही कसोटी क्रिकेटमधील 7 वी वेळ आहे. तसेच भारताच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले आहे.
त्याचबरोबर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1991 मध्ये पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात 13 धावांवर तीन फलंदाज बाद झाले होते.
13 हा अाकडा अनेक खेळांमध्ये अनलकी म्हणजेच अशुभ मानला जातो. तसेच खेळांप्रमाणेच विविध क्षेत्रातही 13 हा अाकडा अशुभ समजला जातो.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना
–कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
–टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम