जेव्हापासून टी२० क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासून क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलले. आधी तंत्रशुद्ध फलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये चित्रविचित्र फटके दिसू लागले. टी२० क्रिकेटमध्ये खर्याअर्थाने फलंदाज नायक झाले. एखाद्या फलंदाजाने एक मोठी खेळी केली तर त्याला भविष्यातील टी२० सुपरस्टार असे बिरुद लावले जाऊ लागले.
मात्र, यादरम्यान अनेक खेळाडू आले ज्यांनी टी२० क्रिकेटमधील भविष्यातील मोठा खेळाडू होण्याचे स्वप्न दाखवले, परंतु ते त्या अपेक्षेवर खरे उतरू शकले नाहीत. आज आपण अशाच तीन फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, यांच्यामध्ये टी२० क्रिकेट गाजवण्याची क्षमता होती मात्र ते त्याला न्याय देऊ शकले नाहीत.
१) डेव्हिड मिलर
दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हा आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून तो सर्वांच्या नजरेत आला होता. त्याच्याकडून अनेक आक्रमक खेळ्यांची अपेक्षा सर्वांनी ठेवलेली. मात्र तो त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. मिलरने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत आत्तापर्यंत ८१ सामने खेळताना १३९ च्या सरासरीने १५२५ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक व केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने काही काळ टी२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व देखील केले.
२) रिचर्ड लेवी
डेव्हिड मिलरप्रमाणेच आणखी एका दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचा यामध्ये समावेश आहे. सन २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण करणारा हा सलामीवीर म्हणजे रिचर्ड लेवी. लेवीने आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकून सर्वांची वाहवा मिळवली होती. मात्र, त्यानंतर तो आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला. त्याला दक्षिण आफ्रिकेकडून १३ टी२० सामने खेळण्यास मिळाले. ज्यामध्ये तो २३६ धावा करू शकला. फलंदाजीतील मर्यादा व फिरकी न समजणे त्याच्या अपयशाचे कारण ठरले. त्याने आयपीएलमध्ये एका हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते.
३) ख्रिस लिन
जगभरातील सर्व टी२० लीगमधील सर्वात मोठा फलंदाज मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये साफ अपयशी ठरला. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी टी२० मध्ये पदार्पण करणाऱ्या लिनने २०१८ पर्यंत १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले ज्यामध्ये तो फक्त २९१ धावा बनवू शकला. २०१८ मध्ये भारताविरूद्ध अखेरचा सामना खेळला पासून तो ऑस्ट्रेलिया संघाबाहेर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट अन् रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील? २३७ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो…
उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…