आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी (८ ऑगस्ट) संघ घोषित केला. २७ ऑगस्ट रोजी आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. भारतीय संघ त्यांचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. अनुभवी सलामीवीर केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहील संघात पुनरागमन करणार आहेत. पण दुसरीकडे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषकात खेळताना दिसणार नाही. आपण या लेखात अशा तीन गोलंदाजांची माहिती घेणार आहोत, जे आशिया चषकात भारतासाठी बुमराहची जागा भरून काढण्याचे काम करू शकतात.
‘हे’ तीन गोलंदाज घेऊ शकतात जसप्रीत बुमराहची जागा –
१. आवेश खान –
आवेश खान (Avesh Khan) आयपीएल आणि भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करणारा गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले आणि आणि यामध्ये एकूण ४७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पदार्पण केले, जेव्हा वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील १४ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे आजपर्यंतचे प्रदर्शन पाहता, आवेश आशिया चषकात बुमराहची जागा भरून काढू शकतो. शेवटच्या षटकांमध्ये, तसेच नवीन चेंडूने देखील आवेश प्रभाव पाडू शकतो.
२. अर्शदीप सिंग –
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने मागच्या महिन्यात भारतासाठी टी-२० पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडीविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि मालिकावीर ठरला होता. २३ वर्षांचा अर्शदीप शेवटच्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आता आशिया चषक २०२२ साठी त्याला भारतीय संघात निवडले गेले आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीपला त्याची जागा भरून काढावी लागेल.
३. रवी बिश्नोई –
फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आशिया चषकात भारतासाठी महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो. बिश्नोईने फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत भारतासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने एकूण १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि १६.५३ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने १६ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या. आशिया चषकात जर त्याने अशाच प्रकारे प्रदर्श केले, तर भारतीय संघाला बुमराहची कमी जाणवणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी
‘बेबी एबी’ची डबल लॉटरी! डेवाल्ड ब्रेविस मुंबई इंडियन्सच्या नव्या फ्रँचायझीचाही बनलाय भाग