आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार देऊन सन्मानित करते. मागच्या महिन्यात विश्वचषकाचा अंतिम सामना आणि शेवटच्या टप्प्यातील सामने खेळले गेले. यादरम्यान, सर्वंच संघांचे खेळाडू अप्रतिम प्रदर्शन करताना दिसले. पण त्यातही तीन असे फलंदाज आहेत, ज्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन करून आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. यात एक भारतीय, तर दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदासाठी दावेदार मानला जात होता. पण अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियासाठी इतिहासातील सहावे विश्वचषक विजेतेपद पटकावले. ट्रेविस हेड (Travis Head) भारतासाठी अंतिम सामन्यात सर्वात मोठी बाधा ठरला आणि आता आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठीही दावेदारी ठोकली आहे. अंतिम सामन्यात हेडने ऑस्ट्रेलियासठी 137 धावांची मॅच विनिंग खेळी केली आणि सामना नावावर केला. असे असले तरी, भारतीय खेळाडूची प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठीची दावेदारी भक्कम मानली जात आहे.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यानेही विश्चचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी ‘सेव्हियर’ची भूमिका पार पाडली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या निर्णायक सामन्यात मॅक्सवेलने 201* धावांची सुरेख खेळी साराकरील. पायाच्या शिरा ताणल्या गेल्याने अष्टपैलूला चालता येत नव्हते. पण उपांत्य फेरीसाठी विजय महत्वाचा असल्यामुळे त्याने खेळपट्टी सोडली नाही. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील कदाचित सर्वोत्तम खेळी देखील असू शकते. त्याचसोबत विश्वचषकानंतर भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 104* धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत भारतीय संघाचा मोहम्मद शमी (Mohammad Shami) यालाही आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. शमीने विश्वचषकात भारतीय संघासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि विरोधी संघाच्या फलंदाजांना धावा खेण्याच्या संधीच दिली नाही. सुरुवातीच्या चार विश्वचषक सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. पण नंतर हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले गेले. वेगवान गोलंदाजाने आपला संपूर्ण अनुभव पनाला लावला आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. विश्वचषक हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम देखील शमीच्या नावावर राहिला. त्याने 12.6च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या. (Three nominations for the ICC Player of the Month Award have been announced )
महत्वाच्या बातम्या –
‘हा संघ वनडेपेक्षा टी20त चांगला…’, बलाढ्य संघाच्या स्टार खेळाडूचे T20 World Cup 2024पूर्वी मोठे विधान
मिचेल जॉन्सनच्या टीकेवर अखेर वॉर्नरने सोडलं मौन! म्हणाला, ‘माझ्या आई वडिलांनी…’