---Advertisement---

Valentines Day Special : विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 10:00 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात खूप सारे असे खेळाडू आहेत, ज्यांनी यश मिळाल्यानंतर लग्न केले. काही नावे अशी आहेत ज्यांनी गुपचूप लग्न उरकले. सचिनबद्दल बोलायचं झालं, तर यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना सचिनला अंजली भेटली. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या अंजलीने सचिनसोबत लग्न केले. अशाच अन्य भारतीय खेळाडूंच्या प्रेम कहाण्या आहेत. कारकिर्दीत यश आणि राष्ट्रीय संघात स्थिरावल्यानंतर खेळाडू लग्न करण्याचा विचार करतो.

काही खेळाडूंनी वय झाल्यानंतर लग्न करणे योग्य समजले, तर काहींनी असे केले नाही. काही क्रिकेटपटूंनी खूप वर्ष प्रेम कहाणी चालू दिली, मग नंतर विवाहबंधनात अडकले. काहींनी लवकरच प्रेमकहाणीला नात्याचे नाव दिले. काही भारतीय खेळाडूंनी लग्नासाठी स्वदेशी ऐवजी विदेशी मुलींना पसंती दिली आहे.

या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्या ३ दिग्गज भारतीय खेळाडूंविषयी जे विदेशी गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकले आहेत.

विदेशी मुलींसोबत लग्न करणारे ३ भारतीय खेळाडू- 

इरफान पठाण:
सौदी अरबच्या सफा बेगशी इरफान पठाण ४ फेब्रुवारी २०१६ रोजी विवाहबंधनात अडकला. सफा मॉडेल आणि पत्रकार आहे. सौदी अरबमधील व्यावसायिक मिर्जा फारुख बेग सफाचे वडील आहेत. सफाने (Safa Baig) जेद्दामधील इंडियन इंटरनॅशनल स्कुलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. इरफान आणि सफाच्या प्रेमकहाणीबद्दल जास्त काही माहिती बाहेर आली नाही. दोघांनीही प्रेमसंबंधाबद्दल गुप्तता राखली होती. लग्नानंतर दोघांबद्दल लोकांना अधिक जाणून घेता आले. इरफान (Irfan Pathan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खास फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या कारकिर्दीला उतरण लागली होती. अशावेळी लग्न करून कौटुंबिक जीवन सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला. दोघेही वैवाहिक आयुष्यात खुश असून एकमेकांना साथ देत आहेत.

हरभजन सिंग:
फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ब्रिटिश मॉडेल गीता बसरा (Geeta Basra) सोबत २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न केले. गीताने खूप साऱ्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. दोघांना हिनाया नावाची मुलगी आहे. हरभजन आणि गीता एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळते.

युवराज सिंग:
युवराज सिंग (Yuvraj Singh) ब्रिटिश- मॉरिशियन अभिनेत्री हेजल किचसोबत (Hazel Keech) ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लग्नाच्या बेडीत अडकला. हेजलचं लग्नानंतर गुरबसंत कौर असे नामकरण करण्यात आले होते. दोघांनीही खूप वर्ष प्रेम कहाणी चालल्यावर लग्न करून नात्याला नाव दिले. आता दोघेही सुखी जीवन जगत आहेत. हेजल किच वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसच्या सातव्या हंगामात दिसली होती.

महत्वाच्या बातम्या:

Valentines Day Special : जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेल्या केन विल्यमसनची नर्सला पाहून पडली विकेट!

चमिका करुणारत्नेला केकेआरने दिला आश्रय; लावली ‘इतक्या’ लाखांची बोली

IPL Auction: इंग्लडचा ‘हा’ गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल; १.५० कोटींची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---