एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी युएईमध्ये रंगलेली ही स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे. यामुळे सर्व संघ कसून सराव करत आहेत. आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील सरावाला सुरुवात केली आहे.
आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्जने निराशाजनक कामगिरी केली होती. या हंगामात चेन्नई संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याचे कारण दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती देखील असू शकते. आयपीएल २०२० मधून सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. यंदा सीएसके संघ आपले चौथे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
अशातच सीएसके संघात ३ नवीन खेळाडूंची निवड करण्यात करण्यात आली आहे, ज्यांना या आयपीएल स्पर्धेत सीएसके संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
१) कृष्णप्पा गौतम : आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कृष्णप्पा गौतम वर सर्वाधिक बोली लावत त्याला अपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. गौतमला संघात समाविष्ट करण्याचे मुख्य कारण म्हणजे, तो फलंदाजीला आला तर चौफेर फटकेबाजी करून धावा करू शकतो. यासोबतच तो गोलंदाजी करताना गडी देखील बाद करून देऊ शकतो. त्यामुळे धोनी गौतमला आपल्या प्लेइंग ११ मध्ये संधी देऊ शकतो. सीएसकेने गौतमला ९.२५ कोटी रुपयांत खरेदी केले आहे. यासोबतच तो आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागणारा अनकॅप खेळाडू देखील बनला आहे.
२) रॉबिन उथप्पा : आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू रॉबिन उथप्पा हा यंदा धोनीच्या सीएसके संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्याने पुन्हा एकदा धोनीच्या नेतृत्वात खेळण्यासाठी उत्साहित असल्याचे म्हटले आहे. रॉबिन उथप्पा ने राजस्थान रॉयल्स आणि केकेआर संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे उथप्पा कडे असलेल्या अनुभवाचा फायदा धोनी नक्कीच घेऊ शकतो.
३) मोईन अली : इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आयपीएल २०२० हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्याला रीलीज करण्यात आले होते. येणाऱ्या हंगामात तो चेन्नई संघासाठी मोठ मोठे फटके मारताना दिसून येणार आहे. मोईन अलीला सीएसके संघाने ७ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले आहे. मोईन अली गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सीएसके संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे या खेळाडूला देखील धोनी आपल्या संघात समाविष्ट करू पाहू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला केलं ब्लॉक; आता पडलाय ‘या’ सौंदर्यवतीच्या प्रेमात!
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक