---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यावर असणार भारताचं वर्चस्व, ‘ही’ आहेत त्यामागची समर्पक कारणे

---Advertisement---

भारताचा मुख्य संघ हा इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला लागला आहे आणि त्याच हेतूने सगळे खेळाडू मुंबईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. इंग्लंडमध्ये त्यांना १८ जून ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामनेसुद्धा खेळायचे आहेत.

तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या दीर्घ कसोटी मालिकेदरम्यान जुलैमध्ये भारताचा श्रीलंका दौरासुद्धा आयोजित केला आहे. या दौऱ्यामध्ये ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामने खेळवण्यात येतील. परंतु या दौऱ्यामध्ये भारताचा दुसरा संघ जाईल याचीसुद्धा घोषणा सौरव गांगुली यांनी केली होती. कारण यावेळी मुख्य भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर असेल.

भलेही श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाची दुसरी तुकडी जाणार आहे; परंतु या गोष्टीला नाकारता येणार नाही की ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार आहे. कारण श्रीलंका दौऱ्यावर सर्व युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे, ज्यांनी देशांतर्गत सामन्यात आणि आईपीएलमध्ये उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे. याबरोबरच इतर काही कारणे आहेत, ज्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे वर्चस्व दिसू शकते. त्याच कारणांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.

३. श्रीलंका संघाची खराब कामगिरी
जेव्हापासून श्रीलंकेचे सर्व अनुभवी खेळाडू निवृत्ती झाले आहेत, तेव्हापासून श्रीलंका संघाकडे त्यांची कमी भरून काढणारे खेळाडूंची कमतरता भासत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या संघावर होत आहे आणि हे सरळ दिसूनही येत आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. गेले कित्येक वर्ष श्रीलंका संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष करतो आहे आणि त्याचाच फायदा हा भारतीय संघाला होऊ शकतो.

२. आईपीएलमुळे आहे भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ
आईपीएलमुळे भारतीय संघाला खूप प्रतिभाशाली युवा खेळाडू मिळाले आहेत. आता भारताकडे एवढे युवा खेळाडू आहेत की भारत सहज दोन संघ तयार करुन मैदानात उतरू शकतो. आईपीएलमुळे भारतीय युवा खेळाडूंना इतर दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते आणि ते नेहमी स्वत:ला सिद्ध करतात. याच कारणामुळे आज भारत सहजपणे आपले दोन संघ मैदानात उतरवू शकतो. म्हणूनच भारतीय संघाला ही मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे.

३. खूप खेळाडू ज्यांना आंतराष्ट्रीय पातळीवर करायचे आहे स्वत:ला सिद्ध
हा दौरा टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने निवड समितीला आकर्षित करुन घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण या दौऱ्यावर बरेचसे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खेळतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. तसेच शिखर धवनसुद्धा आपल्या सुंदर शैलीमध्ये दिसून आला. या दोघांनाही आपली टी२० विश्वचषकातील जागा मजबूत करण्याची संधी असेल.

मधल्या फळीतील मनीष पांडे आणि संजू समसन हे दोघेसुद्धा निवड समितीचा विश्वास जिकण्याच्या हिशोबाने मैदानात उतरतील. तसेच गोलंदाजीमध्येही युवा खेळाडूना सुवर्णसंधी लाभून आली आहे. अशा प्रकारे सर्वच खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर चांगले प्रदर्शन करणे गरजेचे असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvIND: १० कसोटीत ७२७ धावा करणारा ‘हा’ फलंदाज कसोटी मालिकेत चोपणार सर्वाधिक धावा

आयपीएलमध्ये २०१३ पासून ‘हे’ दोन खेळाडू खेळत आहेत, पण नावावर नाही एकही चौकार-षटकार

आतुरता टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची! न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात ‘या’ ५ भारतीयांवर असेल सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---