इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थानने गुजरातला जिकंण्यासाठी १८९ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र राजस्थान गुजरातला रोखण्यास अपयशी ठरली.
प्ले-ऑफसारख्या सामन्यात (Gujarat Titans vs Rajasthan Royals) १८९ धावांचे लक्ष्य साद्य करणे अवघड असते. शिवाय हार्दिक पंड्या प्रथमच कर्णधार पदाची भुमिका बजावताना दिसत आहे. त्यामुळे हर्दिककडून दबावामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे राजस्थानच्या संघाला सुरुवातीपासूनच जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होती. मात्र, राजस्थानला या संधीचे सोनं करता आले नाही आणि गुजरातने संघभावनेचे प्रदर्शन करत आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अंतिम सामन्यामध्ये धडक मारली. पहिल्याच हंगामात अंतिम सामन्यात पोहचण्याच्या विक्रमात चेन्नई आणि राजस्थानची बरोबरी आता गुजरातने केली आहे.
दरम्यान, राजस्थानकडून या सामन्यात काय चूका झाल्या याचा आढावा या लेखातून घेऊ
राजस्थानच्या पराभवाची ३ कारणे –
१. मिलर-पंड्याची विशेष खेळी
दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकांत ट्रेंट बोल्टने वृद्धिमान साहाला बाद केले. त्यानंतर मात्र राजस्थानला ठराविक अंतरावर विकेट्स मिळवण्यात अपयश आले. अशातच डेविड मिलर आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने चांगली भागिदारी केली. ही भागिदारी शेवटपर्यंत राजस्थानचे गोलंदाज तोडू शकले नाहीत. हे राजस्थानच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.
२. चहल-अश्विनचा फ्लॉप शो
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत युजवेंद्र चहल अग्रस्थानी आहे. संपूर्ण हंगामात अश्विनने चहलची चांगली साथ दिली. मात्र गुजरातविरुद्धच्या सामन्यात दोघांच्याही खात्यात एकही विकेट आली नाही. शिवाय दोघांनी मिळून फेकलेल्या ८ षटकांत ७३ धावा दिल्या. त्यामुळे गुजरातच्या फलंदाजांवर दबाव बनवण्यास राजस्थान अपयशी ठरले.
३. शेवटच्या षटकांत खराब गोलंदाजी
राजस्थान विरुद्ध गुजरात हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाऊन पोहोचला होता. शेवटच्या षटकात गुजरातला जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानकडून गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. षटकाच्या पहिल्या तीन चेंडूतच मिलरने तीन षटकार लगावत सामना खिशात घातला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा दबावात गोलंदाजी करू शकतो यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
हेही वाचा
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’
असं काय घडलं? पंड्या, बटलर, मिलरबरोबरच केवळ ३ धावा करणाऱ्या जयस्वालचे झाले जोरदार कौतुक; पाहा Video
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं