आगामी टी20 स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अमेरिकेतील तीन स्टेडियमच्या नावाची घोषणा केली असून, या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या सामन्याच्या आयोजनाचा मान देखील अमेरिकेलाच मिळण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिका संयुक्तपणे टी20 विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. यातील अमेरिकेतील सामने आता फ्लोरिडा, न्यूयॉर्क व डेल्लास येथे खेळले जातील. आयसीसीने ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली. डॅलसमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी ही मैदाने या विश्वचषकासाठी निवडली गेली आहेत.
आयसीसीने याबाबत माहिती देताना म्हटले,
“आम्हाला विश्वचषकासाठी अमेरिकेतील स्थळांची घोषणा करताना आनंद होत आहे. ते प्रथमच आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करतील. ज्यामध्ये 20 संघ ट्रॉफीसाठी लढतील. अमेरिका ही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ आहे.”
https://www.icc-cricket.com/news/3691699/amp?utm_campaign=fullarticle&utm_medium=referral&utm_source=inshorts
न्यूयॉर्क येथील मैदानावर 34 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक व्यवस्था यादरम्यान तयार केली जाणार आहे. ही बैठक व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची असेल. ग्रँड प्रेयरी आणि ब्रॉवर्ड काउंटीचा आकार मॉड्युलर स्टेडियम सोल्यूशन्सद्वारे वाढवला जाईल. जेणेकरून आसन, मीडिया आणि प्रीमियम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांचा विस्तार अंतिम कराराच्या अधीन असेल.
सध्या अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग ही स्पर्धा खेळली गेली. यामध्ये जगभरातील अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला. त्यासोबतच विविध देशातील क्रिकेटपटू अमेरिकेत खेळण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोठे उद्योगपती देखील अमेरिकेत गुंतवणूक करत आहेत.
(Three USA Venues Finalise For 2024 T20 World Cup)
हेही वाचाच-
नंबर 1 वनडे गोलंदाज बनतात सिराजला आठवले वडील, इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत…
शाब्बास करूण! इंग्लंडच्या भूमीवरही बोलली पठ्ठ्याची बॅट, ठोकले दमदार शतक