---Advertisement---

खुन्नस! गांगुली ९९ धावांवर बाद झाल्याचे ऐकताच बाथरुममधून पळत आला ‘हा’ दिग्गज, सुनावली खरीखोटी

---Advertisement---

क्रिकेट आणि वाद, या गोष्टी नव्या नाहीत. बऱ्याचदा काही कारणास्तव प्रतिस्पर्धी संघातील क्रिकेटपटू एकमेकांशी वाद घालतात. तर काही वेळा आपापसांत किंवा अगदी पंचांसोबत क्रिकेटपटूंनी वाद घातल्याच्याही घटना आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली अर्थातच दादाची मैदानातील दादागिरी सर्वांना परिचित आहे. बऱ्याचदा मैदानावर गांगुलीला आपल्या भावना अनावर झाल्या आहेत. त्यातील गांगुली आणि इंग्लंडचा माजी अष्टपैलू एँड्र्यू फ्लिंटॉप यांच्यातील वादाचा एक किस्सा त्याच्या संघ सहकाऱ्याने सांगितला आहे.

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन हा ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगच्या ‘टेस्ट ऑफ टाईम’ या कार्यक्रमात पाहुणा म्हणून गेला होता. तेव्हा त्याने 2002 मध्ये दादा आणि फ्रेडी यांच्यात झालेला कसोटी मालिकेतील एक किस्सा सांगितला होता.

स्टीव्ह हार्मिसनने सांगितले की, नॉटिंघॅम कसोटी सामन्यात माजी भारतीय कर्णधार गांगुलीला फ्लिंटॉपने कसे 99 धावांवर बाद केले होते. हार्मिसनचा हा पदार्पणाचा कसोटी सामना होता. शतकासाठी 1 धाव कमी असताना गांगुली बाद झाला त्यानंतर तो निराश होऊन तो बाहेर जात होता. तेव्हा फ्लिंटॉफ शौचालयातून काही अपशब्द बोलण्यासाठी मैदानात पळत आला होता.

स्टीव्ह हार्मिसन म्हणाला की, “सौरवची काय समस्या आहे हे माहित नाही? कदाचित लोकांचे त्याच्याबरोबर लवकर पटत नाही. मला आठवत आहे की, मी पदार्पणाचा सामना खेळत होतो आणि षटकांच्या पहिल्याच चेंडूवर मी गांगुलीला 99 धावांवर बाद केले होते. अँड्र्यू फ्लिंटॉफ काही मिनिटांपूर्वी शौचालयात गेला होता. परंतु गांगुली बाद झाल्याची बातमी कळताच फ्लिंटॉफ मैदानावर पळत आला, त्यानंतर गांगुलीला काही अपशब्द म्हणू लागले.”

बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार गांगुलीच्या विषयी हार्मिसन पुढे म्हणाला की, “गांगुली एक चांगला व्यक्ती आहे. पण मला माहित नाही की, त्याच्यात असे काय होते की लोक लवकर त्याचे मित्र होऊ शकत नाहीत.”

When HOGG became a Galactico | Test of Time - ft. Brad Hogg | Ep.05

विशेष म्हणजे, या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये अंगावरील शर्ट काढत हवेत फिरवण्याच्या किस्सावरही बरीच चर्चा झाली होती. यापूर्वी त्याने भारत दौर्‍यावर सामना जिंकल्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हवेत शर्ट फिरवून गांगुलीला चिडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या 2002 च्या अंतिम सामन्यात जेव्हा भारताने एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करून त्यानंतर विजेतेपद जिंकले होते. तेव्हा गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीतून त्याचप्रकारे हवेत शर्ट फिरवून फ्लिंटॉफला आणि इंग्लंड संघाला सुरेख प्रत्युत्तर दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; आयसीसीकडून संघांची गटवारी जाहीर

‘नगमा अन् दादाच्या अफेरबद्दल सर्वकाही माहितय,’ म्हणत प्रसिद्ध लेखकाकडून बायोपिकची स्टोरी लिहिण्याची इच्छा व्यक्त

भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील मालिकांच्या तारखांनंतर आता वेळेतही झाला बदल, पाहा किती वाजता सुरु होणार सामने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---