---Advertisement---

तिलक वर्माच्या अनोख्या सेलिब्रेशनमागे रोहितच्या मुलिचा हात! पराभवानंतर फलंदाजाने स्वतः दिली माहिती

On: सोमवार, ऑगस्ट 7, 2023 1:23 PM
Tilak Varma
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (7 जुलै) यगानामध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला, जो या मालिकेतील संघाचा सलग दुसरा पराभव आहे. भारतीय संघाचे फलंदाज या सामन्यात अपयशी ठरताना दिसले, मात्र एकटा तिलक वर्मा (Tilak Verma) चांगल्या फॉर्ममध्ये होता. सामना संपल्यानंतर तिलकने रोहित शर्मा याची मुलगी समायरा हिच्या संबंधीत एका खास गोष्टीचा खुलासा केला.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिलक वर्मा (Tilak Verma) याने 41 चेंडूत 51 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिलकव्यतिरिक्त भारताचा एकही खेळाडू 30 धावांचे योगदान देखील देऊ शकला नाही. तिलक सलग दुसऱ्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. रविवारी त्याने कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक केले. अर्धशतकानंतर तिलकने खास सेलिब्रेशन केले. सामना संपल्यानंतर त्याने या सेलिब्रेशनचा थेट संबंध रोहित शर्मा (Rohit Sharma) याची मुलगी समायरा (Samaira Sharma) हिच्याशी असल्याचे सांगितले.

सामना संपल्यानंतर तिलक म्हणाला, “हे सर्व सॅमीसाठी (समायरा रोहित शर्मा) होते. कारण मी आणि ती खूप सारखे आहोत. आम्हा दोघांचे नाते खरोखर खूप चांगले आहे. मी फक्त एवढेच सांगितले होते की, जेव्हा शतक किंवा अर्धशतक करेल, तेव्हा सर्वात आधी अशाच पद्धतीने जल्लोष करेल. त्यामुळेच मी असे सेलिब्रेशन केले.” दरम्यान, रोहित शर्मा  याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून देखील तिलकच्या अर्धशतकाबाबत खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

तिल वर्मा पुढे रोहित शर्माविषयी म्हणाला की, “होय, निश्चितच मी त्याच्याशी चर्चा करेल. कारण तो माझ्यासाठी सपोर्ट सिस्टम आहे. त्याने माला खेळाचा आनंद घेण्यास सांगितले आहे आणि त्यामुळेच नेहमी माझ्यासोबत खेळाविषयी चर्चा करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसे खेळले पाहिजे याविषयी त्याच्याकडून माहिती मिळाली. मी त्याच्याशी पुढेही चर्चा करेल आणि अधिक मजबूत होऊन संघात पुनरागमन करेल.” (Tilak Verma explained the reason behind the unique celebration after half a century)

महत्वाच्या बातम्या –
कश्मीरच्या रोमानाच्या प्रेमात सरफराज क्लीन बोल्ड! लग्नासाठी मिळाली बहिणीची मदत
BREAKING! स्टार खेळाडूचा पत्ता टक, विश्वचषकासाठी 18 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ घोषित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---