आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील तिलक वर्मा अपयशी ठरली. अवघी एक धाव करून त्याने विकेट गमावल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली.
उभय संघांतील या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी आला. यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. संघाची धावसंख्या 29 अशताना यजसवालने वैयक्तिक 18 धावांची खेळी करून विकेट गमावली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तो तिलक वर्मा (Tilak Verma). युवा फलंदाज तिलक वर्मावर सर्वांचेच लक्ष होते. आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याला भारताकडून खेळवले जाऊ शकते. मात्र त्याने या सामन्यात देखील चांगलीच निराशा केली. मालिकेतील या दुसऱ्या टी-20 सामन्यात तिकल दोन चेंडू खेळला आणि एक धाव करून विकेट गमावली. बॅरी मॅककार्थी याच्या चेंडूवर जॉर्ज डॉकरेल याने तिलका झेल घेतला.
तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील तिकल अशाच पद्धतीने स्वस्तात बात झाला होता. पण तिलक जरी या सामन्यात अपयशी ठरला असला, तरी त्याने भारताने 2 धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघला पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित केले होते. कारण सामन्यात पाऊस आल्यानंतर खेळ पूर्ण झाला नव्हता. (Tilak Verma has failed in the second consecutive T20 match against Ireland)
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी आयर्लंड आणि भारताची प्लेइंग इलेव्हन –
आयर्लंड: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
भारत: यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.
महत्वाच्या बातम्या –
क्लास इज पर्मनंट! 47 व्या वर्षी कॅलिसची झंझावाती फलंदाजी, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…