भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली संघाने हा कारनामा केला होता.
गमतीचा भाग म्हणजे महिलांच्या वनडे विश्वचषकाला १९७३ला सुरुवात झाली तर पुरुषांच्या वनडे विश्वचषकाला १९७५ला सुरुवात झाली. भारतीय संघ २००५ आणि २०१७मध्ये महिलांच्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झाला तर पुरुषांच्या वनडे विश्वचषकात १९८३ व २०११ला विजेतेपद मिळवले तर २००३साली ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.
भारताने आजपर्यंत वनडे विश्वचषकात पुरुषांच्या २, १९ वर्षाखालील विश्वचषकात ४ तर पुरुषांच्या टी२० विश्वचषकात १ असे एकूण 7 विश्वचषक जिंकले आहेत.
भारताचे (युवा, पुरुष, महिला) विश्वचषक विजेते कर्णधार –
कपिल देव – पुरुष वनडे विश्वचषक १९८३
मोहम्मद कैफ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०००
एमएस धोनी – टी२० पुरुष विश्वचषक २००७
विराट कोहली – १९ वर्षांखालील विश्वचषक २००८
एमएस धोनी- पुरुष वनडे विश्वचषक २०११
उन्मुक्त चंद – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१२
पृथ्वी शॉ – १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८






