इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम ब्रेसननने (Tim Bresnan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. ३६ वर्षीय ब्रेसननने त्याच्या २० वर्षाच्या कारकिर्दीला पुर्णविराम दिला आहे. त्याने इंग्लंड संघासठी १४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वाॅरविकशायर क्रिकेट काउंटी क्लबच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या ब्रेसननने त्याचा हा निवृत्तीच्या निर्णय कठीण असल्याच म्हटले आहे. हीच योग्य वेळ म्हणत त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वाॅर्विकशायरने सोशल मिडीयावर त्याचे हे संपूर्ण विधान पोस्ट केले आहे.
टीम ब्रेसनन म्हणाला की, हा निर्णय खुप कठीण आहे. पण हिवाळी प्रशिक्षणानंतर परतल्यानंतर मला असे वाटले की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ज्या खेळावर मी प्रेम करतो त्यासंदर्भात मला खुप उत्साह आहे. २०२२ च्या हंगामात खेळण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार आहे पण माझे शरीर नाही. मी आणि माझ्या सहकार्यांना निर्धारित केलेल्या उच्च मानांकापर्यंत पोहचू शकत नाही, असे मला वाटले होते.
Tim Bresnan's thoughts. 💬
🐻#YouBears | #OnceABearAlwaysABear pic.twitter.com/pyKeVjrisL
— Warwickshire CCC 🏏 (@WarwickshireCCC) January 31, 2022
इंग्लंड संघाकडून खेळण्याबाबत तो पुढे म्हणाला की , “मी खूप भाग्यवान आहे की, मला यॉर्कशायर आणि इंग्लंड संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंडची जर्सी घालण्याची संधी ही अशी गोष्ट आहे जी कधीही हलक्यात घेतली जाऊ नये. मला अभिमान आहे की, मी आपल्या देशाच्या इतिहासात एक छोटीशी भूमिका निभावलेली आहे. मी काही निवडक लोकांचे आभार मानतो ज्यांनी मला माझ्या करियरच्या मार्गावर मार्गदर्शन केले आणि पाठिंबा दिला आहे. तसेच ज्यांनी मला मदत केली त्यांचे सुद्धा खूप आभार.
टीम ब्रेसननने गेल्या वर्षी वॉरविकशायरसाठी काउंटी क्रिकेटचे विजेतेपद जिंकले होते. त्याने तिन्ही प्रकारामध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने टी२० मध्ये २४, एकदिवसीय मध्ये १०९ आणि कसोटी क्रिकेट मध्ये ७२ विकेट घेतल्या आहेत. तसेच दोन ऍशेस मालिका आणि २०१० च्या टी २० विश्वचषकात विजेत्या संघामध्ये त्याचा समावेश होता. वॉरविकशायरचे संचालक पाॅल फारब्रेस म्हणाले की, ब्रेसननची कारकिर्द शानदार होती आणि तो अप्रतिम खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पॉंटिंगने ‘या’ खेळाडूच्या पारड्यात टाकले भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी आपले मत
“‘माझी धोनीबद्दल नाही, तर बीसीसीआयबद्दल तक्रार आहे”
“आम्ही जनावरे खातो म्हणून असे आहोत” अख्तर पुन्हा बरळला