मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) सामना खेळला गेला. आयपीएल इतिहासातील या 1000 व्या सामन्यात इतिहास घडलेला दिसून आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 213 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केला. एक वेळ अशक्यप्राय वाटणारा विजय मुंबईसाठी टीम डेव्हिड याने सोपा केला. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमवरील आपली शानदार आकडेवारी त्याने आणखी उत्कृष्ट केली.
मुंबई इंडियन्सला विजयासाठी आवश्यक असलेल्या 213 धावा पूर्ण करताना सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक करत जवळ आणले होते. मात्र, तो बाद झाला तेव्हा मुंबईला विजयासाठी 26 चेंडूवर 61 धावांची गरज होती. त्यानंतर मैदानात आगमन झालेल्या टीम डेव्हिड याने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. त्याने केवळ 14 चेंडूवर 45 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय प्राप्त करून दिला. अखेरच्या षटकात तीन चेंडूवर तीन षटकार खेचत त्याने सामना मुंबईच्या खिशात टाकला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर डेव्हिड याने आतापर्यंत 7 सामने खेळले या सामन्यांमध्ये त्याच्या वाट्याला 98 चेंडू आले असून, त्यावर त्याने तब्बल 21 षटकार खेचलेत. या सात सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट अनुक्रमे 228, 255, 309, 140, 184,192 व 321 असा जबरदस्त राहिला आहे.
या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला विजय आवश्यक होता. यशस्वी जयस्वाल याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानने 212 पर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला सूर्यकुमार यादव व टीम डेविड यांनी विजयी रेषे पार नेले.
(Tim David Brillant Stats On Wankhede Stadium For Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बर्थडे दिवशी रोहित ठरतो कमनशिबी! आजवर आयपीएलमध्ये राहिलीये अशी कामगिरी
पंजाबकडून हरल्यावर धोनीने लावली गोलंदाजांची क्लास! म्हणाला, ‘त्यांना माहिती हवं की…’