इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला (Indian premier league 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये खेळाडूंचा लिलाव सोहळा पार पडला. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडूंना खाली हात परतावे लागले आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाने सिंगापूरच्या टीम डेविडवर (Tim david) देखील मोठी बोली लावली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिले. परंतु अनेकांना माहीत नसेल की, त्याच्या गर्लफ्रेंडला भारतीय संघाने न पचवणारे दुःख दिले होते. काय आहे नक्की प्रकरण चला जाणून घेऊया.
आयपीएल २०२२ स्पर्धेतील लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनेक धक्कादायक बोल्या लागल्या. त्यापैकीच एक म्हणजे, सिंगापूरचा खेळाडू टीम डेविडवर लागलेली बोली. आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने त्याला ८.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. टीम डेविडची मूळ किंमत केवळ ४० लाख रुपये इतकी होती. त्यानंतर त्याला घेण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा रंगली होती. शेवटी मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिले.
https://www.instagram.com/p/CYkW1FLBRIt/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CZ0OxXDB708/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CSsbKpDpL9Z/?utm_source=ig_web_copy_link
तसेच २५ वर्षीय टीम डेविडच्या गर्लफ्रेंडचे नाव स्टीफ केरशॉ (steph Kershaw) असे आहे. अनेकांनी तिचे नाव ऐकले नसेल. परंतु क्रीडा विश्वात तिचं पहिल्यांदा घेतलं जात नाहीये. स्टीफ केरशॉ हॉकीपटू आहे. तसेच ती ऑस्ट्रेलिया संघांचे प्रतिनिधित्व करते. तिने टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत बाद केले होते.
भारतीय महिला हॉकी संघाने स्टीफ सह संपूर्ण भारतीय संघाला न पचवणारे दुःख दिले होते. भारतीय संघाने या विजयासह इतिहासाला गवसणी घातली होती.
महत्वाच्या बातम्या :
“कदाचित धोनी विसरला वाटतं..” सुरेश रैना अनसोल्ड झाल्यानंतर चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
इलेक्ट्रीशियनचा मुलगा झाला कोट्यवधी!! प्रशिक्षकांनी केलेला सांभाळ, आता खेळणार चॅम्पियन संघासाठी