ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांची टी-20 मालिका शुक्रवारी (7 ऑक्टोबर) संपली. मालिकेतील दुसरा सामना यजमान ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी जिंकला आणि पाहुण्या वेस्ट इंडीज संघाला क्लीन स्वीप दिला. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने तीन विकेट्सने पराभव स्वीकारला होता. उभय संगातील दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू टिम डेविडने ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा षटकार मारला, पण तरीदेखील त्याचे मन भरले नाहीये.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने 41 चेंडूत 75 धावा केल्या. तर टिम डेविड (Tim David) याने अवघ्या 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात ओबेड मेकॉय गोलंदाजीसाठी आला होता. टिम डेविडने या षटकात दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 21 धावा मिळवल्या. याच षटकात त्याने तब्बल 110 मीटर लांब षटकार देखील मारला. हा षटकार ब्रिसबेन स्टेडियमच्या सर्वात बरच्या मजल्यावर गेला.
एवढा लांब षटकार मारून देखील टिम डेविडचे समाधान झाले नाहीये. त्याची इच्छा स्टेडियमच्या वर षटकार मारण्याची होती. त्याला या षटकाराविषयी विचारले गेल्यानंतर डेविड म्हणाला की, त्याला लगेच समजले होते की, हा चेंडू छतावर जाणार नाहीये. कारण त्याने बिग बॅश लीगमध्ये याच मैदानात एक मोठा षटकार मारला होता, जो छतापासून खूप कमी अंतरावर राहिला होता.
https://twitter.com/cricketcomau/status/1578495631504551937?s=20&t=iJYNKulIYON7RZkePPGEXQ
टिम डेविड म्हणाला की, “होय, जेव्हा एखादा शॉट एवड्या मधून जातो तेव्हा हा एक चांगला अनुभव असतो. मी अनेक चेंडू गाबाच्या छतावर जाताना पाहिले आहेत. त्यामुळे एक दिवस त्याठिकाणी पोहोचणे खूप चांगले असेल. मला माझ्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवल्यानंतर खरच खूप चांगले वाटले. मला वाटते मी याठिकाणी अजून एक मोठा षटकार मारला आहे आणि हा छताच्या खूप जवळ होता. त्यामुळे मला लगेच समजले की, हा छताच्या वर जाणार नाहीये. मात्र, तरीही हा एक अप्रतिम अनुभव होता.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 147 धावा केल्या. डेविड वॉर्नरला त्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी सामनावीर निवडले गेले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अवघ्या 20 धावा खर्च करून चार विकेट्सही घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अदानींची क्रिकेटजगतात एन्ट्री! या शहरात बांधणार तब्बल 60,000 कोटींचे स्टेडियम
शेफालीने टी20त रचला इतिहास, तिच्या वयाच्या कुठल्याच खेळाडूला जमला नाही ‘असा’ पराक्रम