---Advertisement---

स्मिथच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती! कर्णधार टीम पेन म्हणाला….

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 5:16 PM
---Advertisement---

१७ डिसेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मलिका सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ वर आहेत. २०१४ नंतर स्मिथ प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये भारताविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. अशातच स्मिथच्या दुखापती बद्दल मागील काही दिवसांत बातमी समोर आली होती. सरावादरम्यान स्मिथच्या पाठीला दुखापत झाली होती व त्याच्या पहिल्या सामन्यातील समावेशाबद्दल सोशल मिडियात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना कर्णधार टीम पेनने सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्मिथ पहिला सामना खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्मिथ बद्दल प्रश्न विचारला असता पेन म्हणाला ,’ स्मिथ पहिला सामना खेळेल अशी आम्हला आशा आहे.स्मिथला या पूर्वीही अनेक वेळा पाठीला अशी दुखापत झाली आहे जी फार सामान्य आहे. स्मिथ सराव सत्रात फार वेळ फलंदाजी करतो काही वेळा अशी समस्या येवू शकते, मात्र ही समस्या गंभीर नाही’.
दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला असल्याने स्मिथ कडून उत्तम कामगिरीची सर्व ऑस्ट्रेलियन चाहत्यांना अपेक्षा असेल. भारताविरुद्ध स्मिथ नेहमीच उत्तम फलंदाजी करतो. भारताविरुद्ध खेळलेल्या एकूण ११ कसोटी सामन्यात स्मिथने ८ शतक झळकावले आहेत.

दरम्यान, भारतीय संघाने पाहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम अकराच्या संघाची घोषणा केली आहे. मयंक अगरवाल सोबत युवा पृथ्वी शाॅ सलामीला उतरेल, तर मधल्या फळीत अपेक्षेप्रमाणे पुजारा, कोहली आणि रहाणे फलंदाजी करतील. अष्टपैलू खेळाडू म्हणून हनुमा विहारी तर यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाला संधी देण्यात आली आहे. गोलंदाजांच्या ताफ्यात बुमराह, शमी, उमेश यादव आणि रवीचंद्रन अश्विनचा समावेश केला गेला आहे.

संबधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? या कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
–  अशाप्रकारे करा स्मिथला बाद, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला उपाय

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---