ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टिम पेन एक वर्षाच्या काळानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. सेक्टटिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली, असे अनेकांचे म्हणणे येत होते. कारणा या प्रकरणानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. असे असले तरी, मोठी विश्रांती घेतल्यानंतर तो मंगळवारी (4 ऑक्टोबर) शेफील्ड शिल्डच्या एका सामन्यात तस्मानिया संघात सहभागी गेले गेले आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेसाठी तयारी करत होता. पण या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला टिम पेन (Tim Paine) याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कारण 2017 साली त्याने एका महिलेला केलेले अश्लील मॅसेजेस सर्वासमोर आले होते. या घटनेच्या एका आढवड्यानंतर त्याने त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून विश्रांती घेतली होती. आता तो पुन्हा एकता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. दरम्यानच्या काळात त्याने मानसिक गोष्टींवर काम केल्याचेही सांगितले जात आहे.
मागच्या वर्षीच्या वादानंतर त्याच्यावर अनेकांनी टीका जरी केली गेली असली, तरी त्याने निवृत्ती मात्र घेतली नव्हती. अशात आता तो तस्मानियाच्या 13 सदस्यीय संघात सहभागी झाला आहे. गुरुवारी ब्रिस्बेनमध्ये क्वीन्सलँड संघाविरुद्ध शेफील्ड शिल्ड स्पर्धेतील सामना खेळला जाणार आहे, ज्यामध्ये पेन मैदानात पुनरागमन करू शकतो. तस्मनियाचे प्रसिक्षक जेफ वॉन याविषयी बोलताना म्हणाले, “तो मागच्या काही महिन्यांपासून आमच्या सोबत आहे ट्रेनिंग करत आहे आणि हा पूर्णपणे संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता. कोणलाही संघात जगातील सर्वश्रेष्ठ यष्टीरक्षकांपैकी एक स्वतःच्या संघात हवाच असेल.”
चालू महिन्यात 16 तारखेपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू वेडचा समावेश केला गेला आहे. भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. असा अंदाज बांधला जात आहे की, पेन देखील लवकरच ऑस्ट्रेलिया संघासाठी कसोटी मालिका खेळताना दिसू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटलाही मराठी जमतंय की राव! सूर्यकुमारच्या पोस्टवरील ‘रनमशीन’ कोहलीची ‘ती’ कमेंट वेधतेय लक्ष
देश नव्हे आयपीएल महत्त्वाची! पदार्पणापासून 131 सामन्यात बुमराह अनुपस्थितीत; धक्कादायक आकडेवारी समोर