अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 6 डिसेंबर पासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या 11 जणांच्या संघाची कर्णधार टीम पेनने बुधवारी(5 डिसेंबर) घोषणा केली आहे.
आॅस्ट्रेलियाच्या या अंतिम संघात युवा फलंदाज मार्क्यूस हॅरिसला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे. मात्र आॅस्ट्रेलियाच्या अंतिम 11 जणांच्या संघातून उपकर्णधार मिशेल मार्शला वगळण्यात आले आहे.
हॅरिसबद्दल आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, ‘हॅरिसने शेफिल्डशिल्ड स्पर्धेत 8 डावात 500 धावा केल्या आहेत. तो खूप चांगला युवा खेळाडू आहे. मी पाहिलेल्या बऱ्याच नेट सराव सत्रात तो मला उत्कृष्ट वाटला.
तसेच अष्टपैलू मिशेल मार्शच्या ऐवजी पिटर हँड्सकॉम्बला संधी देण्यात आली आहे. त्याने मागील आठवड्यात शतकी खेळी केली होती. तसेच मागीलवर्षी झालेल्या अॅडलेड कसोटीपासून पहिल्यांदाच आॅस्ट्रेलियाचा संघ अष्टपैलू खेळाडूशिवाय मैदानात उतरणार आहे.
त्यामुळे आॅस्ट्रेलिया संघ फक्त मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लिआॅन या चार गोलंदाजांसह पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
तसेच मार्शला वगळण्याबद्दल कर्णधार पेन म्हणाला, ‘आम्हाला माहित आहे की मिशेल मार्शमध्ये काय क्षमता आहे आणि या मालिकेत कोणत्यातरी क्षणी आम्हाला त्याची गरज लागणार आहे.’
आॅस्ट्रेलियाच्या मधल्या फळीत शॉन मार्श, ट्रेविस हेड हे फलंदाज असतील. तसेच गोलंदाजही चांगली कामगिरी करतील असा कर्णधार पेनने विश्वास व्यक्त केला आहे.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे पहाटे 5.30 वाजता सुरुवात होणार आहे.
असा आहे 11 जणांचा आॅस्ट्रेलिया संघ-
अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लिआॅन.
Marcus Harris to debut, but no Mitch Marsh for Australia.
XI: Harris, Finch, Khawaja, Shaun Marsh, Handscomb, Head, Paine (c), Cummins, Starc, Lyon, Hazlewood #AUSvIND pic.twitter.com/xuEp5pRZjf
— ICC (@ICC) December 5, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?
–रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका
–अॅडलेड कसोटीसाठी अंतिम १२ जणांच्या टीम इंडियामध्ये या खेळाडूंना मिळाले स्थान