ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याला तुम्ही फलंदाजी करतांना पाहिलं असेल. तसेच यष्टिरक्षण करतांना पाहिले असेल. परंतु आता त्याचे नवीन रूप मैदानावर पाहायला मिळाले आहे. टीम पेन एका सामन्यात चक्क गोलंदाजी करताना दिसून आला. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने आपल्या संघासाठी गोलंदाजी केली.
प्रथमश्रेणी सामन्यात केली गोलंदाजी
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तस्मानिया प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन गोलंदाजी करतांना दिसून आला आहे. त्याने १० षटके गोलंदाजी केली. यात त्याने ६० धावा दिल्या. गोलंदाजी दरम्यान त्याने ६ वाईड चेंडू फेकले. आणि मुख्य बाब म्हणजे एक गडी बाद सुद्धा केला. याआधी सुद्धा त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजी केली आहे.
PAINE HAS A WICKET! His off-spin ends a 114 run partnership between Caleb Jewell and Tom Rogers.
Watch the @CTPremierLeague One Day Final Live: https://t.co/aQgjm0kopn pic.twitter.com/Yrxh18RoEX
— PlayCricket AU (@PlayCricketAU) February 8, 2021
भारतीय संघाविरुद्ध आलेले अपयश
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला २-१ ने पराभूत केले होते. यावेळी देखील ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद टीम पेन याच्याकडे होते. टीम पेन आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर टीम पेन याला कर्णधार पदावरून काढून जलद गोलंदाज पॅट कमिन्स याला कर्णधार करण्याची मागणी केली जात आहे.
टीम पेनचा फलंदाजी फॉर्म देखील सध्या चिंतेचा विषय आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी साधारणच राहिली होती. त्यामुळे येत्या काळात त्याच्या कर्णधारपदाबद्दल आणि संघातील स्थानाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलिया काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या:
शंभराव्या कसोटीत इंग्लंडच्या संघनायकाचा दे घुमा के! चोपल्या २५० हून अधिक धावा