---Advertisement---

शंभराव्या कसोटीत इंग्लंडच्या संघनायकाचा दे घुमा के! चोपल्या २५० हून अधिक धावा  

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 3:40 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दमदार फलंदाजी करताना २५० हून अधिक धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, रुट त्याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.

पहिल्या डावात धडाकेबाज फलंदाजी करताना रुटने २१८ धावा केल्या होत्या. ३७७ चेंडूत २ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ३२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. अशाप्रकारे दोन्ही डावात मिळून त्याने एकूण २५८ धावा केल्या आहेत.

यासह कसोटी कारकिर्दीतील १०० व्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज रिकी पाँटिंग याबाबत अव्वलस्थानी आहेत. त्यांनी आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात तब्बल २६३ धावा केल्या होत्या. पाँटिंग आणि रुटनंतर पाकिस्तानचे माजी फलंदाज इंजमाम-उल-हक २१५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

शंभराव्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

२६३ धावा- रिकी पाँटिंग

२५८ धावा- जो रुट

२१५ धावा- इंजमाम-उल-हक

१४९ धावा- गॉर्डन ग्रिनीज

रुट बाद झाल्यानंतर शाहबाज नदीमने ऑली पोपला झेलबाद केले. चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३१ षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या आहेत. सध्या जोस बटलर १८ चेंडूत १५ धावांवर आणि डॉमनिक बेस १३ चेंडूत ४ धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंड पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीमुळे सध्या ३७५ धावांसह पुढे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG Test Live : नदीमने ऑली पोपला बाद करत इंग्लंडला दिला सहावा धक्का, मात्र इंग्लंडकडे ३७५ धावांची आघाडी

लॉरेन्सला बाद करत इशांतने पूर्ण केल्या ३०० कसोटी विकेट्स, पण ‘या’ बाबतीत पडला मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---