---Advertisement---

पहिल्या चेंडूवर इंग्लंडला धक्का देत अश्विनने घडवला इतिहास, तब्बल ११४ वर्षांनंतर केला ‘हा’ किर्तीमान

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 1:07 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. यामुळे पहिल्या डावात पाहुण्यांनी २४२ धावांनी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरताच पहिल्या चेंडूवर इंग्लंडला मोठा धक्का बसला.

भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स याला शून्यावर बाद केले. यासह अश्विनने कसोटीतील शानदार विक्रम आपल्या नावे केला आहे. अश्विन हा कोणत्या कसोटी डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा भारताचा पहिला फिरकीपटू ठरला आहे. तर जगातील तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

सर्वप्रथम इंग्लंडचे माजी फिरकीपटू बॉबी पिल यांनी या शानदार विक्रमाची नोंद केली होती. १८८८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या चेंडूवर त्यांनी ऍलेक बॅनरमन यांना बाद केले होते. त्यांच्यानंतर १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकाचे माजी फिरकी गोलंदाज अल्बर्ट वॉगलर यांनी हा किर्तीमान आपल्या नावे केला होता. इंग्लंडच्या टॉम हॉवर्ड यांना बाद करत त्यांनी या विक्रमाला गवसणी घातली होती. यानंतर तब्बल ११४ वर्षांनंतर अश्विनने हा पराक्रम केला आहे.

भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात

भारताचा पहिला डाव ९५.५ षटकांत ३३७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला २४१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे. भारताकडून या डावात वॉशिंग्टन सुंदरने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय रिषभ पंत(९१) आणि चेतेश्वर पुजारा(७३) यांनीही अर्धशतके केली. तर आर अश्विनने ३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावांचा टप्पा गाठता आला.

इंग्लंडकडून डॉमनिक बेसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जॅक लीच, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅच, कॅच अन् नुसते कॅच! चेन्नई कसोटीत पाहुण्यांच्या हातून भारताचा अख्खा संघ झेलबाद

घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सुंदरचा बोलबाला, पन्नाशी पार करत नोंदवला खास विक्रम

“रिषभ पंतला बेफिकिरी आणि निष्काळजीपणा यातील छोटा फरक कळला तर तो आणखी सातत्यपूर्ण कामगिरी करेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---