भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नई येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने पहिल्या दिवशीपासून यजमान भारताला दबावाखाली ठेवले आहे. इंग्लंडच्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे ६ फलंदाज माघारी परतले. त्यानंतर युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने अर्धशतकाहून अधिक धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, हा सुंदरचा मायभूमीतील पहिलाच कसोटी सामना आहे. यासह एक खास विक्रम सुंदरच्या नावावर झाला आहे.
सुंदरने जानेवारी २०२० मध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६२ धावांची खेळी केली होती. या खेळीसाठी त्याने १४४ चेंडूंचा सामना केला होता आणि १ षटकार व ७ चौकार मारले होते.
यानंतर चेन्नई येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सुंदरने १३८ चेंडूत नाबाद ८५ धावांची खेळी आहे. यात २ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश आहे. अशाप्रकारे मायदेशात आणि परदेशात पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा खास विक्रम सुंदरच्या नावावर झाला आहे.
त्याच्यापुर्वी तब्बल ७ भारतीय फलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. यात सक्रिय फलंदाजातील मयंक अगरवाल आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. तर माजी क्रिकेटपटूंमध्ये रुसी मोदी, एस अमरनाथ, अरुण लाल, सौरव गांगुली आणि सुरेश रैना यांनी ही खास कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG Test Live :आर अश्विन-सुंदरची अर्धशतकी भागीदारी तोडण्यात जॅक लीचला यश, भारताला ७ वा धक्का
बांग्लादेश वि. वेस्ट इंडिज कसोटीदरम्यान ३ भारतीय नागरिकांना अटक, जाणून घ्या कारण
पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक






