चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात २४२ धावांची आघाडी घेतली आहे. यादिवशी सकाळच्या सत्रात इंग्लंडने भारताच्या ४ खेळाडूंना झटपट झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर ८५ धावा करून पहिल्या डावात नाबाद राहिला. तत्पुर्वी तिसऱ्या दिवसाखेर भारताचे आघाडीचे ६ फलंदाजही झेलबाद झाले होते.
अशाप्रकारे पाहुण्या इंग्लंडने एका डावात भारताच्या दहाच्या दहा फलंदाजांना झेलबाद करण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, तब्बल २० वर्षांनंतर कोणत्या पाहुण्या संघाने एका कसोटी डावात भारताच्या सर्व खेळाडूंना झेलबाद केले आहे.
यापुर्वी २७ फेब्रुवारी ते १ मार्च २००१ मध्ये मुंबई येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना झाला होता. या सामन्यातील पहिल्या डावात स्टिव्ह वॉच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने भारताचे दहाच्या दहा खेळाडू झेलबाद केले होते. तसेच १९८८ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने भारताचे सर्व खेळाडू झेलबाद केले होते.
वॉशिंग्टन सुंदरची चिवट झुंज
दरम्यान सामन्याविषयी बोलायचे झाले तर, इंग्लंडचा कर्णधार जो रुट याच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेही २० पेक्षा कमी धावांवर पव्हेलियनला परतले. यष्टीरक्षक रिषभ पंतने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच चेतेश्वर पुजारा (७३ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद ८३ धावा) यांनीही योगदान दिले. सुंदरला वगळता खालच्या फळीतील इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सुंदरचा बोलबाला, पन्नाशी पार करत नोंदवला खास विक्रम
विराट कोहलीचा धावांचा दुष्काळ संपता संपेना, मागील १४ महिन्यांपासून केलं नाही एकही शतक





