---Advertisement---

लॉरेन्सला बाद करत इशांतने पूर्ण केल्या ३०० कसोटी विकेट्स, पण ‘या’ बाबतीत पडला मागे

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 3:01 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. यामुळे पहिल्या डावात पाहुण्यांनी २४२ धावांनी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला फलंदाज डॅनियल लॉरेन्स याला पायचित करत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने कसोटीतील ३०० विकेट्स पूर्ण केल्या. परंतु ही खास कामगिरी करण्यासाठी त्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.

हा सामना इशांतचा कसोटी कारकिर्दीतील ९८ वा सामना आहे. या सामन्यापुर्वी इशांतने ९७ कसोटी सामन्यातील १७५ डावात गोलंदाजी करताना २९७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला कसोटी कारकिर्दीतील ३०० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ३ विकेट्सची गरज होती.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने २ फलंदाजांना बाद केले. यात जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. त्यानंतर नुकतीच दुसऱ्या डावात लॉरेन्सची तिसरी विकेट घेत त्याने ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

अशाप्रकारे इशांत हा सर्वात हळूवार कसोटीतील ३०० विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याउलट फिरकीपटू आर अश्विन हा सर्वात जलद ३०० कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने कारकिर्दीतील ५४ व्या कसोटी सामन्यात हा किर्तीमान केला होता. त्याच्यानंतर ६६ कसोटी सामन्यात हा पराक्रम करत अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर हरभजन सिंग, कपिल देव आणि झहीर खान यांचाही टॉप-५ मध्ये समावेश आहे.

सर्वात जलद ३०० कसोटी विकेट्स घेणारे भारतीय 

५४ सामने- आर अश्विन
६६ सामने- अनिल कुंबळे
७२ सामने- हरभजन सिंग
८३ सामने- कपिल देव
८९ सामने- झहीर खान
९८ सामने- इशांत शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

इशांतची कसोटी विकेट्सची ‘ट्रिपल सेंचूरी’ पूर्ण; कुंबळे-कपिल यांच्या खास यादीत झाला समावेश

मोठी बातमी! रिषभ पंतने जिंकला आयसीसीचा ‘हा’ नवा पुरस्कार; रुट, स्टर्लिंगला टाकले मागे

अश्विनने पहिल्या चेंडूवर दिला इंग्लंडला धक्का, ठरला शानदार किर्तीमान करणारा पहिला भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---