मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता जानेवारी या महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मिळाला आहे.
पंतने या पुरस्कारासाठी नामांकन असलेल्या इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि पॉल स्टर्लिंग या क्रिकेटपटूंना मतदानात मागे टाकले आहे आणि हा पुरस्कार जिंकला आहे. पंतने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २ कसोटी सामने खेळले होते. या दोन्ही कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली होती.
A month to remember Down Under for @RishabhPant17 and India ????
Congratulations to the inaugural winner of the ICC Men’s Player of the Month award ????
???? https://t.co/aMWlU9Xq6H pic.twitter.com/g7SQbvukh6
— ICC (@ICC) February 8, 2021
पंतची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी –
रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात जानेवारी महिन्यात सिडनी आणि ब्रिस्बेन येथे कसोटी सामने खेळले. सिडनी कसोटीत पंतने दुसऱ्या डावात पुजारासह १४८ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, या कसोटीत त्याने शानदार ९७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे आणि पुझे आर अश्विन आणि हनुमा विहारीने केलेल्या चिवट भागीदारीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले होते.
त्यानंतर ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात शेवटच्या डावात ३२८ धावांचे मोठे आव्हान समोर असताना पंतने तडाखेबंद फटकेबाजी करताना नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताला अशक्यप्राय वाटणारे आव्हान पार करण्यात यश आले होते. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजयही मिळवला होता.
Congratulations, @RishabhPant17! pic.twitter.com/5q8YxIS8P4
— ICC (@ICC) February 8, 2021
रुट, स्टर्लिंगची कामगिरी –
आयसीसीच्या नव्या पुरस्कारासाठी रुट आणि आयर्लंडच्या स्टर्लिंगलाही नामांकन मिळाले होते. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने श्रीलंकेविरुद्ध जानेवारीमध्ये २२८ आणि १८६ धावांच्या झुंजार खेळी केल्या होत्या. तसेच स्टर्लिंगने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन आणि युएई विरुद्धच्या दोन वनडे सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्याने ५ वनडेत मिळून ३ शतकांसह ४२० धावा केल्या आहेत.
अशा पद्धतीने दिले जातील पुरस्कार
या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येणार आहे. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येईल.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतील.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करेल. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतील. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असेल. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
इशांतची कसोटी विकेट्सची ‘ट्रिपल सेंचूरी’ पूर्ण; कुंबळे-कपिल यांच्या खास यादीत झाला समावेश
जेम्स अँडरसनने इशांत, बुमराहची विकेट घेत भारताविरुद्ध केला ‘हा’ मोठा विक्रम
अश्विनने पहिल्या चेंडूवर दिला इंग्लंडला धक्का, ठरला शानदार किर्तीमान करणारा पहिला भारतीय






