---Advertisement---

धोनीएवढे कसोटी षटकार माराणारा न्यूझीलंडचा गोलंदाज! इंग्लंडविरुद्ध खेळताना नावावर केला नवा विक्रम

On: शनिवार, फेब्रुवारी 25, 2023 5:06 PM
Tim Southee
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाहुण्या संघाने यजमान न्यूझीलंड संघाचा कसोटी मालिकेत चांगलाच घाम काढला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने 267 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात देखील इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. असे असले तरी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदी याने एका खास विक्रमात भारतीय संघाचा महान कर्णधार एमएस धोनी याची बरोबरी केली आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या वेलिंगटनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 7 बाद 138 धावा केल्या. वेगवान गोलंदाज टिम साउदी (Tim Southee) आणि टॉम ब्लंडल (Tom Blundell) खेळपट्टीवर कायम आहेत. या दोघांनी अनुक्रमे 23 आणि 25 धावा केल्या आहेत आणि तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करतील. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी साउदीने केलेल्या 23 धावांमध्ये एक षटकार देखील सामील होता. या षटकाराच्या जोरावर त्याने भारताचा माजी दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) याची बरोबरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत आता धोनी आणि साउदी बरोबरीवर पोहोचला आहेत. या यादीत पहिला क्रमांक इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा आहे. स्टोक्सने आतापर्यंत 109 कसोटी षटकार मारले आहेत. यातीत 14व्या क्रमांकावर साउदीने जागा मिळवली आहे. दरम्यान, बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केलेल्या खेळीनंतरच या यादीत पहिला क्रमांक पटकावला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
बेन स्टोक्स — 109
ब्रँडन मॅक्युलम – 107
एडम गिलक्रिस्ट – 100
ख्रिस गेल – 98
जॅक कॅलिस – 97
विरेंद्र सेहवाग – 91
ब्रायन लारा – 88
ख्रिस केर्न्स – 87
विव रिचर्ड्स – 84
एँड्र्यू फ्लिंटॉफ – 82
मॅथ्यू हेडन – 82
मिस्बाह उल हक – 81
केविन पीटरसन – 81
टिम साउदी – 78*
एमएस धोनी – 78

दरम्यान, उभय संघांतील या कोसटी सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 435 धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावून 138 धावा केल्या. (Tim Southee equaled MS Dhoni for most Test sixes)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्व बाजूंनी टीका होत असताना हरमनप्रीतला मिळाला अनुष्काचा पाठिंबा; म्हणाली, ‘तुझा आणि तुझ्या संघाचा…’
‘माशाल्लाह फिटनेस तगडीच आहे…’, जास्त वजनामुळे आझम खानला पाकिस्तान संघात संधी मिळत नाहीये?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---