---Advertisement---

टीम साऊथी सुपर ओव्हरमध्ये ठरतोय अनलकी; जाणून घ्या ही नकोशी आकडेवारी

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 7:20 PM
---Advertisement---

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) चौथा टी20 सामना स्काय स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात भारताने या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये न्यूझीलंड संघ 6 व्यांदा सुपर ओव्हर खेळल्यानंतर पराभूत झाला आहे. न्यूझीलंडने आत्तापर्यंत एकूण 7 टी20 सामन्यात सुपर ओव्हर खेळले आहेत. त्यातील केवळ 1 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

आज झालेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊथीने गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे साऊथीने आत्तापर्यंत न्यूझीलंडकडून 6 टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. .यातील केवळ एका सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तर अन्य 5 सामन्यात न्यूझीलंडने पराभव स्विकारला आहे.

हा एकमेव विजय न्यूझीलंडने क्राईस्टचर्च येथे 2010मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात मिळवला आहे. त्यामुळे साऊथीची सुपर ओव्हरमधील आकडेवारी पाहता तो न्यूझीलंडसाठी सुपर ओव्हरमध्ये अनलकी ठरल्याचे दिसून येत आहे.

टीम साऊथी न्यूझीलंडकडून सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेले टी20 सामने – 

विरुद्ध ऑस्ट्रेलिया – टी20, क्राईस्टचर्च, 2010 (विजय)

विरुद्ध श्रीलंका – टी20, पाल्लेकेले, 2012 (पराभव)

विरुद्ध वेस्ट इंडिज – टी20, पाल्लेकेले, 2012 (पराभव)

विरुद्ध इंग्लंड – टी20, ऑकलंड, 2019 (पराभव)

विरुद्ध भारत – टी20, हॅमिल्टन, 2020 (पराभव)

विरुद्ध भारत – टी20, वेलिंग्टन, 2020 (पराभव)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---