भारत आणि न्यूझीलंड संघात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. हा सामना गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सुरू झाला. भारतीय संघाचा पहिला डाव ३४५ धावांवर गुंडाळला गेला. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने एका डावात सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साऊदीच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला फलंदाजी करण्याची संधी आली. सामन्यात साऊदीने ग्रीन पार्क स्टेडियमच्या खेळपट्टीचा योग्य वापर केल्याचे पाहायला मिळाले.
त्याने नवीन आणि जुन्या चेंडूने या स्टेडियमवरील संथगतीच्या खेळपट्टीवर उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला हैराण करून सोडले. न्यूझीलंडच्या कायले जेमिसनने देखील पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. साऊदीकडे भारतीय वातावरणात खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत ८० कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी १३ सामन्यात त्याने पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. भारतात त्याने ही कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. साऊदीसाठी हा त्याचा भारतातील तिसरा कसोटी दौरा आहे.
दरम्यान, त्याने फलंदाजांनी पुढे येऊन खेळण्यासाठी फुललेंथ गोलंदाजी केली. जी भारतीय गोलंदाजांना जमली नाही. भारताता खेळण्याचा अनुभव असल्यामुळे तो अशी गोलंदाजी करू शकलो, असे असे साऊदी म्हणाला आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर असताना केले होते. तो म्हणाला की, “मी युवा होतो, तेव्हापासून मला जगातील या भागात खेळण्याची संधी मिळाली. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, ज्या युक्त्या मला शिकवल्या गेल्या, त्यातून खूप काही शिकलो आहे.”
साऊदीचा २०१८ नंतर विदेशी वेगवान गोलंदाजाच्या रूपात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सरासरी राहिली आहे. त्याने याबाबतीत पॅट कमिन्स, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला मागे सोडले आहे. तो क्रिकेटच्या तिनही प्रकारांमध्ये खेळतो. मात्र, कसोटी क्रिकेटकडे त्याची विशेष ओढ आहे. तो त्याच्या बॅगमध्ये नेहमी लाल चेंडू ठेवतो, या गोष्टीवरून त्याचे कसोटी क्रिकेवरचे प्रेम समजते.