न्यूझीलंड क्रिकेट संघाने १८ ते २३ जून दरम्यान पार पडलेल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ८ विकेट्सने पराभव केला आणि इतिहास रचला. १४४ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटला न्यूझीलंडच्या रुपात पहिला विश्वविजेता संघ मिळाला. त्यांच्या या विजयात वेगवान गोलंदाज टीम साऊदीचे मोठे योगदान आहे. त्याने अंतिम सामन्यातच नाही तर संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडसाठी शानदार कामगिरी केली. आता त्याने एक निर्णय घेतला आहे, ज्याचे खूप कौतुक होत आहे.
जर्सीचा करणार लिलाव
टीम साऊदीने कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वापरलेल्या जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या जर्सीवर अंतिम सामन्यात खेळलेल्या न्यूझीलंडच्या संघातील खेळाडूंच्या स्वाक्षरी केलेल्या आहेत. या जर्सीच्या लिलावातून जे पैसे मिळणार आहेत, ते पैसे ८ वर्षीय होली बिटीच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. होली जुलै २०१८ पासून न्यूरोब्लास्टोमा या दुर्मिळ कर्करोगाशी झुंज देत आहे. गेले २ वर्षे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण अजून ती पूर्णपणे बरी झालेली नाही.
होलीवर मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेवेळी त्याच्या मेंदूमध्ये ३ सेंटीमीटरची गाठ सापडली. पण तिच्यावर अजूनही उपचाराची गरज असून काही उपचार न्यूझीलंडमध्ये शक्य आहेत, तर काही उरचार स्पेनमध्ये जाऊन करावे लागणार आहे. त्यामुळे येणारा खर्च हा तिच्या कुटुंबासाठी हाताबाहेरचा आहे.
त्यामुळे साऊदीने त्याच्या जर्सीच्या लिलावातून होलीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच त्याने सर्वांनाच होलीची मदत करण्याचे अवाहन केले आहे.
Tim Southee is auctioning off one of his match worn playing shirts from the WTC Final to support Hollie Beattie and her ongoing medical treatment needs.
You can find the @TradeMe auction here | https://t.co/a57Lcs7I23
Hollie's story | https://t.co/nq7b2ioMU1 pic.twitter.com/GKEpErCWbd
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 29, 2021
होलीच्या कुटुंबाचे कौतुक
साऊदीने त्याच्या पोस्टमध्ये होलीच्या कुटुंबाचेही कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे की ‘माझ्या कुटुंबाला होलीबद्दल काहीवर्षांपूर्वी माहिती झाली. तिच्या कुटुंबाच्या चिकाटी, सामर्थ्य आणि सकारात्मक वृत्तीचे मला नेहमीच आश्चर्य वाटले आहे. मी जेव्हा ऐकले की होलीला आणखी उपचाराची गरज आहे, तेव्हा मी तिला मदत करण्यासाठी मार्ग शोधत होतो.’
त्याने पुढे लिहिले की ‘मला आशा आहे की हा शर्ट (जर्सी) बिटी कुटुंबाला त्यांच्या वैद्यकिय गरजा पूर्ण करण्यासाठी थोडी सहाय्यता करेल. एक पालक म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. बिटी कुटुंबाचे सामर्थ हे आठवण करुन देईल की आम्ही जरी क्रिकेट मैदानावर यश किंवा अपयश मिळवू, पण हे सर्व होली सारख्या आरोग्याच्या समस्येशी झगडताना येणाऱ्या आव्हानांच्या तुलनेत गौण आहे.’
https://www.instagram.com/p/CQsBxgyFdJh/
साऊदीने २०१९-२०२१ दरम्यान पार पडलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडकडून ११ सामन्यांत सर्वाधिक ५६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने अंतिम सामन्यात ५ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलनंतर विराटची गळाभेट घेतानाच्या व्हायरल झालेल्या फोटोवर विलियम्सनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Video: शोएब अख्तरचा मुलगा ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फॅन; त्याच्याच गाण्यावर धरलाय ठेका
टी२० विश्वचषक भारतातून युएईमध्ये का हलवण्यात आला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा