बेंगलोर | गुरूवार पासून सुरू झालेल्या भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्यात एक आनोखा योगायोग जुळून आला आहे. हा योगायोग तामिळनाडूसाठी एक विशेष क्षण आहे.
या सामन्यात अश्विन, मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. एकाच सामन्यात तामिळनाडूच्या तीन खेळाडूंना प्रतिनिधीत्व करण्याची संंधी 1961 नंतर पहिल्यांदाच मिळाली.
यापूर्वी भारतीय कसोटी संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तामिळनाडूच्या ए.जी मिल्खा सिंग, ए.जी कृपाल सिंग आणि व्ही.व्ही कुमार या तीघांनी 1961 साली मुंबई येथे झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या कसोटी स्थान मिळवले होते.
हा योगायोग जुळून यायला तब्बल 57 वर्षे लागली.
यावर भारताचे माजी कर्णधार के.श्रीकांत यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, ” हि तामिळनाडू क्रिकेटसाठी गर्वाची बाब आहे. यातून आपल्याला हे दिसतेय की, तामिळनाडू क्रिकेटची प्रगती होत आहे.”
“अश्विन, विजय आणि कार्तिक खूप प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यांच्यात आणखी खूप क्रिकेट शिल्लक आहे.”
“तसेच आमच्याकडील विजय शंकर आणि वाशिंग्टन सुंदरसारखे तरूण खेळाडूही आहेत जे मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हा तामिळनाडू क्रिकेटसाठी सुवर्ण काळ आहे.” असे भारताचे माजी सलामिवीर के.श्रीकांत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
–ना सचिन, ना कपिल, ना धोनी… अशी कामगिरी केली आहे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी
–टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके